कॅरम प्रशिक्षण केंद्र : नाशिकच्या जिल्हा क्रीडा संकुलात सुरु झालंय Nashik Sports

खेळाडूंनी याचा लाभ घेऊन प्रगती कारावी : जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक

नाशिक : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक जिल्हा क्रीडा परिषद आणि नाशिक जिल्हा कॅरम असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांच्या अंतर्गत असलेल्या नाशिकच्या शिव छत्रपती क्रीडा संकुलामध्ये कॅरम या खेळाचे प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले. Carrom Training Center started ShivChhatrapati Nashik District Sports Complex DSO

नाशिकचे जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी कॅरम खेळून या प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन केले. यावेळी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अशोक दुधारे, आनंद खरे, नाशिक जिल्हा कॅरम असोसिशनचे सचिव अशोक कचरे, नितीन हिंगमिरे, कॅरम प्रशिक्षक साजिद सय्यद, चंद्रकांत भाग्यवंत, मनोज म्हस्के, आशिष पवार सौ. चारुलता सूर्यवंशी तसेच नाशिकचे क्रीडा संघटक आणि क्रीडा शिक्षक उपस्थित होते.

Carrom Training Center started ShivChhatrapati Nashik District Sports Complex DSO, कॅरम प्रशिक्षण केंद्र नाशिकच्या जिल्हा क्रीडा संकुलात सुरु Nashik Sports नाशिक खेळ खेळाडू शिव छत्रपती क्रीडा संकुल जिल्हा परिषद नाशिक जिल्हा कॅरम असोसिएशन associationअधिकारी रवींद्र नाईक

या वेळी बोलतांना जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी सांगितले की, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे असलेल्या खेळांच्या सुविधा, साहित्य, क्रीडांगणे यांचा खेळाडूंना जास्तीत जास्त उपयोग व्हावा या हेतूने या संकुलात व्हॉलीबॉल, फूटबॉल, तलवारबाजी, खो-खो, कबडडी, धनुर्विद्या (आर्चरी), मैदानी खेळ अशा विविध खेळांच्या सुविधाचा वापर होत आहे.

याचप्रमाणे कॅरम या खेळासाठी खेळाडूंना चांगल्या सुविधा आणि मार्गदर्शन मिळावे या हेतूने या संकुलात कॅरम प्रशिक्षण केंद्राची सुरवात करण्यात आली आहे. या प्रशिक्षण केंद्रासाठी आठ कॅरम उपलब्ध करून देण्यात आले असून खेळाडूंची संख्या वाढल्यास आणखी कॅरम उपलब्ध करून दिले जातील असे यावेळी रवींद्र नाईक यांनी सांगितले.

यावेळी कॅरमबद्दल माहिती देतांना आनंद खरे यांनी सांगितले की, नाशिकमध्ये २००६ सालापासून आठ राज्य अजिंक्यपद स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दूरसंचार केंद्र. एल. आय. सी. अनेक राज्य शासनाचे कार्यालये आदींच्या राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन केले गेले आहे. Carrom Training Center started ShivChhatrapati Nashik District Sports Complex DSO

तसेच नाशिकच्या अनेक खेळाडूची  विविध राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सतत निवड होत आहे. आणि म्हणूनच  नाशिकच्या खेळाडूंना कॅरमचा नियमित सराव मिळावा आणि चांगले मार्गदर्शन  मिळावे आणखी चांगल्या सुविधा मिळाव्या या दृष्टीने या कॅरम प्रशिक्षण केंद्राची सुरवात करण्यात आली आहे.

काय असेल या प्रशिक्षण केंद्रात? –

या  प्रशिक्षण केंद्रामध्ये खेळाडूंना कॅरमचे  प्राथमिक धडे दिले जाणार आहेत तर जिल्हा आणि राज्य स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूसाठी ऍडव्हान्स प्रशिक्षण  दिले जाणार आहे. यासाठी जिल्हा कॅरम असोसिएशनचे सचिव अशोक कचरे, शकील खान तसेच प्रशिक्षक साजिद सय्यद यांचे नियमित मार्गदर्शन मिळणार आहे.

तसेच  खेळाडूंना आणखी चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन मिळण्याच्या हेतूने नाशिक व्यतिरिक्त मुंबई, ठाणे, पुणे येथील  तज्ज्ञ मार्गदर्शक आणि राष्ट्रीय स्पर्धेत विजेते खेळाडू यांचेही मार्गदर्शन  मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी नाशिकच्या जास्तीत जास्त खेळाडूंनी या संधीचा लाभ घाव्या असे अवाहन  यावेळी करण्यात आले.

Carrom Training Center started ShivChhatrapati Nashik District Sports Complex DSO

Connect with Us on WhatsApp : 9689754878, 8830486650 (Save This Number and send Hi or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.