लुटमार : एक कोटी ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला

परप्रांतीय टोळीकडून लुटमार नित्याची असली तरी या टोळीने रविवारी रात्री मध्यरात्रीच्या सुमारास लुटमार करत कंटेनरसह त्यातील मौल्यावान वस्तु असा एक कोटी ६२,७० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला. या जबरी चोरी विरोधात वाहनचालकाने मालेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. प्राथमिक तपासात हा प्रकार संशयास्पद असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.
बिहार येथील वाहनचालक जमशेद सुलेमान अन्सारी (३५) हा  खाजगी कंपनीत कंटनेर वर वाहनचालक म्हणून काम करत आहे. १७ तारखेला रांजनगाव परिसरातील गोदामातून त्याने एल. जी. कंपनीचे एल ए. डी, एल.सी.डी टीव्ही चे ७३ नगर भरले. हे वाहन १८ रोजी रात्री बारा साडेबाराच्या सुमारास मालेगाव येथील चोंढी घाटात आले. त्यावेळी वाहनासमोर अचानक एक इनोव्हा कार येऊन थांबली. कंटेनर थांबवले असता वाहनचालकाला मारहाण करत त्याच्या तोंडात बोळा कोंबला. त्याचे हात, पाय बांधून डोक्यावर फडके टाकत त्याला कार मध्ये कोंबण्यात आले. दरम्यान, चोरांनी कंटनेर व त्यामधील माल, वाहनचालकाच्या खिशातील १२, ६०० रोख रक्कम, भ्रमणध्वनी असा एकुण एक कोटी ६२ लाख सत्तर हजार रुपये किंमतीचा माल चोरला. वाहनचालकाचे अपहरण करत त्याला इनोव्हामधूनच दोन दिवस फिरवत आग्राच्या पुढील एका महामार्गावर २० तारखेच्या पहाटे फेकुन दिले व तेथुन पलायन केले. सकाळी नैसर्गिक विधीसाठी जाणाºया स्थानिक महिलांनी त्यांची सोडवणूक केली. त्याने तेथील पोलीस ठाणे गाठत मालकाला संपुर्ण हकिगत सांगितली. मालक व वाहनचालक यांनी मालेगाव पोलीस ठाणे गाठत अज्ञात चोरट्यांविरूध्द तक्रार दिली.
पोलीसांना दिलेल्या माहितीनुसार, सहा अज्ञात लोकांनी अपहरण करत वाहनात कोंबले व तेथुन पोबारा केला एवढीच माहिती वाहनचालक देत असल्याने पोलीसांना पुढील तपासात अडचणी येत असून हा सर्व प्रकार संशयास्पद असल्याचे तपास अधिकाºयाने सांगितले.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.