गाडीचे टायर फुटून अपघात, एकाच कुटूंबातील तिघे जागीच ठार

नाशिक : मुंबई- आग्रा महामार्गावर चांदवड येथील रेणुकामाता मंदिराजवळ बंद असलेल्या बसला पाठीमागून चारचाकी गाडी धडकल्‍याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात वणी येथील एकाच कुटूंबातील तिघे जागीच ठार झाले. चारचाकी गाडीचे टायर फुटल्याने गाडी  बसवर जाऊन आदळल्याने सदरचा अपघात झाला.

वणी येथील सप्तशृंग पतसंस्थेचे संचालक संजय समदडीया, पत्नी वंदना समदडीया व मुलगा हिमांशु समदडीया अशी मृतांची नावे आहेत. धुळे येथे नातेवाईकाच्या विवाह सोहळ्यास ते गेले होते. विवाहसोहळा आटोपून वणी येथे परतत असताना हा अपघात झाला. फोर्ड फिगो या गाडीमधुन ते परतीचा प्रवास करत होते. यावेळी संजय समदडीया यांचे समवेत प्रवास करणारा दुसरा मुलगा जखमी असुन चांदवडच्या रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.