जम्मू काश्मीर, यूपीतील निर्दयी घटनांच्या निषेधार्थ लासलगाव येथे कँडल मार्च

लासलगाव (वार्ताहर समीर पठाण) : जम्मू काश्मीर व उत्तर प्रदेश येथील निर्दयी घटनेच्या निषेधार्थ लासलगाव येथे कँडल मार्च काढून तीव्र निषेध नोंदविण्यात आला. candle march lasalgaon city protesting against ruthless events kathua unnao

जम्मू काश्मीर येथील कटुवा येथे ८ वर्षीय मुलीवर केलेले अत्याचार आणि खून तसेच  उत्तर प्रदेश येथील उन्नाव येथील घरकाम करणाऱ्या मजुराच्या १६ वर्षीय मुलीवर आमदाराने वारंवार अत्याचार केलेल्या आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप होत आहे. या झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी या निंदनीय घटनांचा निषेध नोंदवत आरोपीस फाशी देण्याची मागणी करत लासलगाव येथे कॅण्डल मार्च काढून सर्व धर्मीय महिला व पुरुषांनी निषेध व्यक्त केला.

बुधवार संध्याकाळी सहा वाजता हा कॅण्डल मार्च ग्रामपंचायत कार्यालयाच्या पटांगणापासून मेन रोड, डॉ. आंबेडकर पुतळा, बाजार पेठ ते छत्रपती शिवाजी चौक पर्यंत काढण्यात आला. त्यानंतर तेथे सर्व पक्षीय व सर्व धर्मियांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. candle march lasalgaon city protesting against ruthless events kathua unnao

 

candle march lasalgaon city protesting against ruthless events kathua unnao जम्मू काश्मीर, यूपीतील निर्दयी घटनांच्या निषेधार्थ लासलगाव येथे कँडल मार्च news, nashik maharashtra निषेध अप्लावायीन मुलींवर अत्याचार Cm Yogi Death Sentence For Rapist justice for asifa ashifa rape case rising incidents बलात्कार
या प्रसंगी आरोपी नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी सहायक पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. मोर्चात सर्वधर्मीय नागरिक सहभागी झाले होते.

“आता नाही तर कधीच नाही, “भारत को न्याय चाहीये, आसिफाके गुन्हेगारो को सिर्फ फासी चाहीये, बलात्कारीयो भारत छोडो” असे फलक हातात घेऊन लासलगाव व परिसरातील महिला मोठय़ा संख्येने मोर्चात सहभागी झाल्या होत्या.

या प्रसंगी लासलगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच जयदत्त होळकर यांनी दोन्ही घटनांचा निषेध केला व गुन्हेगारांना अटक व शिक्षा करण्याची मागणी केली. या दोन्ही घटनांमुळे देशभर संतापाची लाट उसळली आहे देशातील बालिकांचे आपण रक्षण करू शकत नाही ही लाजिरवाणी बाब असून दोन्ही गुन्ह्यातील आरोपींना कठोर शिक्षा झाल्याशिवाय चिमुकल्यांना न्याय मिळणार नाही असेही ते म्हणाले. candle march lasalgaon city protesting against ruthless events kathua unnao

तसेच या घटनेचा प्रकाश पाटील, गुणवंत होळकर, रामनाथ शेजवळ, डॉ. अमोल शेजवळ, राफीयोद्दीन काजी येवला, रश्मी पालवे, फारूक मौलाना, कैलास केदारे, संतोष पानगव्हाणे यांनी तीव्र निषेध व्यक्त केला.

या प्रसंगी ललित दरेकर, डॉ. विकास चांदर, सचिन होळकर, गोकुळ पाटील, नाना बंदसोडे, किशोर गोसावी, प्रिन्स भल्ला, बबन शिंदे, अश्विन शिंदे, वेदिका होळकर, रेवती होळकर, राणी शहा, गुलशन मंसुरी, सोहेल मोमीन, फिरोज मोमीन यांच्या सह लासलगाव व परिसरातील सर्व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सर्व समाजातील नागरिक उपस्थित होते.

candle march lasalgaon city protesting against ruthless events kathua unnao

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा !

Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.