कठुआ तसेच उंनाव घटनेचा निषेध : नाशकात कॅण्डल मार्च

कठुआ तसेच उंनाव येथे असिफा आणि सपना या मुलींवर झालेल्या बलात्कार तसेच हत्येच्या विरोधात शहरात विराट मोर्चाचे आयोजन सोमवारी संध्याकाळी करण्यात आले होते. यावेळी शहरातील पत्रकार, विचारवंत, सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर एकत्र येत निषेध नोंदवला. Candle light march nashik condemn Kathua Unnao rape cases
शहीद भगतसिंग चौक द्वारका येथून मोर्चाला सुरूवात झाली. यावेळी असिफा ला न्याय मिळावा, मुलींना वाचवा, बलात्काऱ्यांना फासावर लटकवा अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी लहान मुलीही मोर्चात सहभागी झाल्या होत्या.  मेनरोडवरील गाडगे महाराज चौकात या मोर्चाचे विराट निषेध सभेत रूपांतर झाले. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी काही काळ मेनरोडवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली होती.
 People of all ages and from various sections coming together to show their support to the innocents who were victimised. Holding banners and lighting candles for peace, the mood was serene as they spoke out about the evils still plaguing our society. They were accompanied by the local police, residents of nashik city  and various NGOs. It was heartening to see little kids walking with placards pondering on their safety in the near future.
 यावेळी आम्ही नाशिककर या संघटनेतर्फे मोर्चास संबोधित करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री, पंतप्रधान यांनी असिफा, सपना यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा करावी, तसेच यापुढे अशाप्रकारे कोणत्याही महिलांवर अत्याचार झाल्यास जागा झालेला, संविधान मानणारा भारत देश त्याचा कडाडून निषेध केल्याशिवाय शांत बसणार नाही. बलात्कारी प्रवृत्तीस पाठीशी न घालता सरकारने त्यांच्याविरोधात ठोस पाऊले उचलावी असे आवाहन यावेळी करण्यात आले. जस्टीस फॉर असिफा, सपना, भारत माता की जय, यासारख्या घोषणांनी यावेळी मेनरोडचा परिसर दुमदुमून गेला होता.
Candle light march nashik condemn Kathua Unnao rape cases

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi and your  name and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा ! Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.