‘समृद्धी’ साठी जमिन खरेदीस प्रारंभ ; लगेच केली खात्यात रक्कम जमा

इगतपुरी येथेसमृद्धीसाठी जमिन खरेदीस प्रारंभ

नाशिक: मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचा नाशिक दौरा आणि दुसरीकडे प्रशासनाने तयारी करत समृद्धी महामार्ग जमीन हस्तांतरन सुरु केले आहे. समृद्धीला विरोध नाही हे दाखवण्यासाठी व्यवहार सुरु केले गेले असून, काही शेतकरी वर्गाच्या जमिनी घेवून लगेच त्याना पैसे दिले गेले आहे. त्यामुळे आता समृद्धी वर पेटलेला मार्ग मुख्यमंत्री दौऱ्यात मोठा विरोध शेतकरी वर्ग करणार आहे.

इगतपुरी येथे समृद्धी महामार्गासाठी जमिन खरेदी करण्याच्या प्रक्रीयेचा शुभारंभ विभागीय आयुक्त महेश झगडे आणि जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या उपस्थितीत झाला.  दुय्यम निबंधक कार्यालयात धामणगाव ता. इगतपुरी येथील तीन शेतकऱ्यांची मिळून गट नं.242 ची  एकूण 2.0991 हे.आर जमिन खरेदी करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहकार्यकारी संचालक किरण कुरुंदकर, उपजिल्हाधिकारी तथा प्रशासक (नवनगरे) विठ्ठल सोनवणे, उपविभागीय अधिकारी राहुल पाटील, तहसीलदार अनिल पुरे, दुय्यम निबंधक झोपे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे तहसीलदार मिनाक्षी राठोड यांनी खरेदी केली. जमिन खरेदीनंतर एका तासात संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात  एकूण 4 कोटी 31 लाख पंधरा हजार पाचशे एकोणसत्तर एवढी रक्कम जमा करण्यात आली. बँकेत रक्कम त्वरीत जमा झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून या रकमेचा उपयोग नवी जमिन खरेदी करून चांगली शेती करण्यासाठी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. उर्वरीत रक्कम बँकेत ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.  थेट खरेदीमुळे पंचवीस टक्के रक्कम अधिक मिळाल्याने त्यांनी शासनाला धन्यवाद दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा कार्यक्रम

नाशिक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-

रविवार  30 जुलै 2017 रोजी सकाळी 11.55 वा.ओझर  विमानतळ नाशिक येथे आगमन दु.12 वा. मोटारीने लासलगांवकडे प्रयाण  दु.12.45  वा. कांदा आणि नाशवंत पदार्थांसाठी मल्टीपर्पज कोल्ड स्टोरेजचा भूमिपूजन समारंभ. दु.2.30 वा. लासलगांव येथून मोटारीने मेळा बस स्थानक नाशिककडे प्रयाण, दु. 3.30 वा. मेळा बस स्थानक येथे आगमन व मेळा बसस्थानकाचा भुमिपूजन समारंभ. दु. 4.30 वा. मेळा बस स्थानक येथून मोटारीने दिंडोरी कडे प्रयाण. सायं.5.00 वा.  श्री स्वामी समर्थ केंद्र दिंडोरी येथे आगमन सायं. 5.45 वा. दिंडोरी येथून मोटारीने ओझर विमानतळाकडे प्रयाण सा.6.10 वा. ओझर विमानतळ येथे आगमन व मुंबईकडे प्रयाण.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.