Bus Ape Accident Deola : मेशी अपघातातील मृतांची संख्या 21 वर

Bus Ape Accident Deola

नाशिक : मालेगाव कळवण एसटी बस आणि ॲपे रिक्षाचा झालेल्या अपघातातील मृतांची संख्या 21 वर पोहचली आहे. तर 35 प्रवासी जखमी झाले आहेत. 19 मृतांची ओळख पाठविण्यात यश मिळाले आहे.

एसटीचा टायर फुटून रिक्षासह रस्त्याच्या कडेला विहिरीत पडल्याची घटना मंगळवारी (दि. 28) घडली. या भीषण अपघातात रिक्षा प्रवाश्यांसह बसखाली विहिरीतील पाण्यात अडकल्याने मृतांची संख्या वाढली.

घटना घडल्यानंतर तातडीने स्थानिकांच्या मदतीने पोलीस आणि अग्निशमन दलाने बचावकार्य सुरू केले. एसटीत अडकलेल्या प्रवाश्यांना दोराच्या साहाय्याने मागील काच फोडून बाहेर काढण्यात आले. काहींना उमराणे येथील तर काहींना देवळा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मृतांच्या नावाची आमच्यापर्यंत आलेली यादी अशी…

या दुर्देवी घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार छगन भुजबळ यांनी परिवहन विभागाशी केली. परिवहन महामंडळाच्या बसमधील मृत व्यक्तींना रुपये १० लक्ष तर गंभीर स्वरूपात जखमी झालेल्यांना प्रत्येकी रुपये ५ लक्ष देण्यात येतील तर रिक्षामधील अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून जास्तीत जास्त आर्थिक मदत केली जाईल असे भुजबळ यांनी सांगितले.

दरम्यान भाजपचे आमदार डॉ. राहुल आहेर पूर्णवेळ घटनास्थळी थांबून प्रसंगी बचावकार्यात मदत करीत होते. त्यांनी जखमी व मृतांच्या नातेवाईकांना धीर देण्याचे कार्य केले. प्रशासकीय तजवीज पाहिली.

बसमध्ये एकूण ४३ प्रवासी होते. यात सात लहान मुलांचा समावेश आहे. एकूण 35 जखमी आहेत.

अपघातात जखमींची यादी

नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे देखील घटनास्थळी असून बचाव कार्य सुरू आहे. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करून व मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्याची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. 02592228209 या क्रमांकावर हेल्पलाइन सुरू केली आहे. Bus Ape Accident Deola

अपघातग्रस्त ॲपे रिक्षा विहिरीच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आली. वाहनाची झालेली अवस्था बघता अपघात किती भीषण असेल याची कल्पना यावी.

अपघात कव्हरेज : NashikOnWeb – Bus Rickshaw Accident Deola : एसटी बस ॲपे रिक्षासह विहिरीत कोसळली, अनेक अडकल्याची भीती

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.