आकाशवाणी टॉवर : आरक्षीत जागेवर बिल्डरची मनमानी, बिल्डरचे बांधकाम बंद पाडले

आरक्षीत जागेवर बिल्डरची मनमानी, नागरिकांचे आंदोलन

मनपा – बिल्डर मिलीभगत असा नागरिकांचा आरोप

नाशिक :महापालिकेच्या आरक्षीत भूखंडावर बिल्डरकडून सुरू असलेला शॉपींग कॉप्लेक्सचे बांधकाम स्थानिक नागरीकांनी विरोध केला आहे. तर हे बांधकाम त्यांनी एकजूट होत बंद पाडले आहे. नागरी वसाहत असलेल्या आकाशवाणी टॉवरजवळ हे आंदोलन बुधवारी केले आहे. यात मोठा घोटाळा असून आरक्षण असतांना येथे बांधकाम होतेच कसे आरोप करत शिवसेनेने या  आंदोलनात उडी घेतली आहे. तर नागरिक आता न्यायालयात याबाबत याचिका दाखल करणार आहेत.

नागरिकांचे धरणे आंदोलन

यामध्ये उच्चभ्रू गंगापूररोड परिसरातील असलेल्या शिवारातील सर्व्हे नं. ७०५ याभागातील शेवटच्या  भूखंडावर खेळाचे मैदान, क्रिडांगण आणि शॉपींग सेंटरचे आरक्षण देण्यात आले आहे.यामध्ये हे आरक्षण ए.आर.  अर्थात समावेशक आरक्षणामार्फत विकसीत Developed by Inclusive Reservations करण्याचा निर्णय मनपाने आधीच घेतला असून. मात्र या आरक्षणे विकसीत न करताच बिल्डर्स आपल्या सोयीने शॉपींग कॉम्पलेक्स बांधायला सुरुवात केली आहे.

धरणे पाहताच राजकीय पक्ष आंदोलनात सहभागी झाले

यात विशेष मनपा ने त्या बिल्डरला सहाय्य करत खासगी विकासनासाठी रोड फ्रंड जागा देखील स्थलांतरीत करून दिली आहे.मात्र हे चुकीचे असून कायद्यानुसार आरक्षणाचा विकास साद्य होत नाही असे नागरिकांनी आपले मत मांडले आहे.बिल्डरच्या या कारनाम्यामुळे येथे विकास केला तरनागरिकांचे  क्रीडांगण पूर्ण  झाकले जाते तसेच त्यासाठी कमी जागा मिळते एक तर या परिसरात एकही क्रीडांगण नाही त्यात मनपा आणि बिल्डरच्या या हातमिळवणी मुळे अनेक प्रश्न निर्माण होता आहेत.

नागरिकांनी महितीच्या अधिकारात अनेकदा या गोष्टी मागितल्या मात्र मनपाने योग्य उत्तर देणे टाळले आहे. यासंदर्भात फाईली मागण्याचा प्रयत्न केल्यानंतरही महापालिका टाळाटाळ केली. बिल्डरने शॉपींग कॉम्प्लेक्सचे काम सुरू केल्यानंतर येथील जॉगींग ट्रॅकवर फिरणे कठीण झाले. त्यामुळे बुधवारी (दि. १२) सकाळी नागरीकांनी धरणे आंदोलन सुरू केले. किशोर शिरसाट, संजय खैरनार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू असताना शिवसेनेचे महानगर प्रमुख आणि विरोधी पक्ष नेता अजय बोरस्ते तसेच गटनेता विलास शिंदे यांनी देखील येथे भेट देऊन पाठींबा दिला. त्यानंतर नागरीकांनी बिल्डरचे सुरू असलेले बांधकाम बंद पाडले.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.