उजवा तट कालव्यालगत सायकल ट्रॅक उभारावा : नाशिक सायकलीस्टची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नाशिक सायकलीस्टची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नाशिक : शहरातील ३२ किमी मार्गाच्या नाशिक उजवा तट कळवा येथे सिटी बस साठी ट्रॅक निर्माण करण्याचा प्रस्ताव असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करावी लागणार आहे. त्यामुळे या मार्गावर सिटी बस ट्रॅक ऐवजी सायकल ट्रॅक उभारावा अशी मागणी नाशिक सायकलीस्टतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. Build Cycle track adjoin South Canal nashik cyclists writes cm

सायकलीस्टचे अध्यक्ष प्रविणकुमार खाबिया व सदस्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची नाशिकरोड येथील विभागीय कार्यालयात शुक्रवारी (दि. 5) भेट घेऊन या वरील मागणीचे निवेदन दिले.

उजवा तट कालव्यालगत महापालिकेने जॉगिंग ट्रॅक उभारला आहे. आता या ठिकाणी सिटीबस साठी विशेष रस्ता बनविण्याचा प्रस्ताव आहे. मात्र त्यासाठी येथील हजारो वृक्षांची कत्तल होईल. त्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होईल. त्यामुळे या मार्गावर सायकल ट्रॅक उभारावा अशी निवेदनात करण्यात आली आहे. Build Cycle track adjoin South Canal nashik cyclists writes cm

नाशिक शहरात सायकल चळवळ जोर धरत आहे. पुण्यासारख्या शहरात महापालिकेने विशेष ट्रॅक तयार केला आहे. असे असताना नाशिकमध्ये मात्र सायकलिंगसाठी अशी कोणतीही सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही. त्यामुळे उजव्या तट कालव्यालगत सायकल ट्रॅक उभारल्यास सायकल चळवळीला बळ मिळेल. सायकलप्रेमींना हक्काचा सायकल ट्रॅक मिळून सुरक्षितताही प्रदान होईल. यापूर्वी वॉक विथ कमिशनर या उपक्रमात आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे सायकल प्रेमींनी ही मागणी केली होती. त्यांनी देखील या प्रस्तावाबाबत सकारात्मकता दर्शविली होती.

मुख्यमंत्र्यांनी नाशिक शहर दत्तक घेतले असून सायकल प्रेमींसाठी वरील मार्गांवर सायकल ट्रॅक उभारावा असे साकडे मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे घालण्यात आले. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन, प्रदेश सरचिटणीस लक्षमण सावजी, माजी नगरसेवक कुणाल वाघ, नाशिक सायकलीस्टचे उपाध्यक्ष राजेंद्र वानखेडे, आदींसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Build Cycle track adjoin South Canal nashik cyclists writes cm

प्रतिक्रिया

मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन सायकल ट्रॅक उभारण्यासाठी निवेदन दिले. मुख्यमंत्र्यांनी या निवेदनाबाबत सकारात्मकता दर्शवत सायकलीस्टताफे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे कौतुक करत सायकल ट्रॅक उभारण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन लक्ष घालतील असे आश्वासन दिले.

– प्रविणकुमार खाबिया, अध्यक्ष, नाशिक सायकलीस्ट

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.