विना सूचना सलग चार दिवस सेवा होती बंद
सटाणा प्रतिनिधी – (प्रशांत कोठावदे) : भारतीय दूरसंचार विभागाच्या करंजाड विभागात विस्कळीत सेवा विस्कळीत झाल्याने ग्राहक त्रस्त झाले असून, बीएसएनएलच्या या अशा कारभारा विरोधात ग्राहक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. Bsnl service disconnected karanjal satana baglan customers agitation mobilizing nashikonweb
सध्याच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात भारतीय दूरसंचारच्या बागलाण तालुक्यातील करंजाड येथील केंद्रा अंतर्गत येणाऱ्या भागात रेंज गायब झाली आहे. अतिशय सावळा गोंधळात कारभार होत असल्याने सेवा विस्कळीत झाली आहे. कंपनीच्या या वर्तनाला ग्राहक वैतागले आहेत.
गेल्या आठवड्यात सलग चार दिवस सेवा खंडित होती संबधित वरिष्ठ कार्यालयास याबाबत स्थानिक जागरूक ग्राहकांनी तक्रार केली. मात्र तेथूनही समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याने ग्राहकात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. या मुजोर कर्मचाऱ्यांवर अंकुश ठेवणारे गेलेत कुठे असा प्रश्न निर्माण होत आहे. Bsnl service disconnected karanjal satana baglan customers agitation mobilizing nashikonweb
अनेक ग्राहकांनी वैतागुन भारतीय दूरसंचार कंपनीला ‘राम, राम’ ठोकत इतर खाजगी कंपनी कडे वळाले आहेत. मात्र याचा कंपनी कर्मचारी वर्गावर कुठलाही परिणाम नाही. उलट येणाऱ्या तक्रारी कडे सोयीस्करपणे पाठ फिरवण्याचे काम सुरु आहे.
भारतीय दूरसंचार निगमच्या या भोगळ कारभारा विरोधात आंदोलन करण्याचा इशारा नामपुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक कृष्णा नाना भामरे, प्रगतिशील शेतकरी केदा दावल भामरे, खंडू शेवाळे, शशीकांत बापू देवरे, करंजाडच्या सरपंच उज्वला राकेश देवरे, डॉ धनंजय देवरे, पिंगळवाडयाचे सरपंच विट्ठल देवरे, दिलीप शेवाळे, गुलाब देवरे, शांताराम शेवाळे, राकेश देवरे, उध्दव देवरे, सोपान भामरे, अ. भा. युवा संमेलन तालुकाध्यक्ष केवळ देवरे व ग्राहकांनी दिला आहे.