ब्रिज खेळाचा एशियन गेम्स मध्ये समावेश, नाशिक मध्ये होणार सराव शिबीर

नाशिक शहरात ज्युनिअर व सब ज्युनिअर गटाच्या भारतीय संघाचे प्रशिक्षण शिबीर
नाशिक : २०१८ मध्ये जकार्ता शहरात होणाऱ्या एशियन गेम्स या स्पर्धेत ब्रिज खेळाचा समावेश झाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य ब्रिज संघटनेचे सचिव हेमंत पांडे यांनी दिली. या स्पर्धेत ब्रिज खेळाचे 3 सांघिक व 3 पेअर्स (जोडी) असे 6 प्रकारच्या सांघिक स्पर्धा होणार आहे.
इतर खेळा प्रमाणेच ब्रिज खेळाच्या ज्युनिअर व सब ज्युनिअर गटाच्या आंतर राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केल्या जाणार असून मे  2017 मध्ये सेऊल येथे होणाऱ्या ज्युनिअर व सब ज्युनिअर गटाच्या एशियन चॅम्पिअनशिप स्पर्धेसाठी तसेच जुलै 2017 मध्ये फ्रान्स येथे होणाऱ्या ज्युनिअर व सब ज्युनिअर गटाच्या जागतिक ब्रिज स्पर्धेत देखील  भारतीय संघ सहभागी होणार आहे.
आनंदाची बाब म्हणजे या दोन्ही स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड नाशिक येथे  28 ते 30 एप्रिल 2017 रोजी आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण शिबिरांमधून केली जाणार असल्याची माहिती सूर्य रेड्डी यांनी दिली. या शिबिरास 43 खेळाडू उपस्थित राहणार असून त्यांना चंद्रशेखर देशपांडे ( पुणे ) व परिमल वालिया ( अहमदाबाद ) हे प्रशिक्षक मार्गदर्शन करणार आहेत. ब्रिज खेळाचा एशियन गेम्स मध्ये समावेश झाल्यानंतर भारतीय संघाची निवड करण्यासाठी नाशिक जिल्ह्याला प्रथमच संधी मिळाली आहे.

गंगापूर रोड वरील गुप्ता गार्डन येथे दुपारी २ वाजता या प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन ब्रिज फेडरेशनचे सचिव आनंद सामंत, राज्य संघटनेचे सचिव हेमंत पांडे, भारतीय फेडरेशनचे ज्युनिअर विंग प्रमुख डिओन डिसुझा , मित्रविहार क्लबचे अध्यक्ष विनोद कपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती डॉ. अतुल दशपुत्रे यांनी दिली.

ब्रिज  lखेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिकृत मान्यता मिळाल्याने साईने ( Sprots Authority of India ) देखील या खेळासाठी आर्थिक तरतूद खर्च करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे ब्रिज खेळा कडे जास्तीतजास्त तरुण आकर्षित होईल असा विश्वास मित्राविहार क्लबचे अध्यक्ष विनोद कपूर यांनी व्यक्त केला.

काय आहे ब्रिज हा खेळ? जाणून घेऊया… लेख लवकरच…

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.