भाजप आमदाराच्या लाचखोर नातेवाईकास अटक !

नाशिक महानगरपालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयातील घरपट्टी विभागाच्या लिपिकाला १० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. लाचखोर लिपिक संजय पटेल हे नाशिकच्या  आमदार यांचे  नातेवाईक/ भाऊ आहेत, हे विशेष.
नळजोडणी मिळवण्यासाठी तक्रारदाराने अर्ज केला होता. त्यांच्याकडे संजय पटेल याने ३५ हजारांची लाच मागितली. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली हाती. त्यानुसार रंगपंचमीच्या दिवशी लिपिक पटेल यास १० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदाराने संजय वनारसीभाई पटेल (वय 45) यांच्याविरोधात  तक्रार केली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शहानिशा करून शुक्रवारी सायंकाळी (ता.२) सापळा रचला. त्यानुसार पथकाने त्यांना तक्रादाराकडून लाच स्वीकारताना अटक केली. संजय पटेल हे भाजपा आमदार  यांचे  भाऊ आहेत, हे विशेष. याप्रकरणी पुढील कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चालू आहे.

संशयित संजय पटेल विरूद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. या प्रकरणातील महिला तक्रारदाराने संजय पटेल हा ३५ हजार रूपयांची मागणी करत असल्याची तक्रार केली. फ्लॅटसाठी नळ कनेक्शन देण्यासाठी लाच मागण्यात आली. त्यापैकी सहा हजार रूपये त्वरीत घेण्यात आले होते. याबाबत तक्रार केल्यानंतर त्याची पडताळणी करण्यात आली. तडजोडीअंती दहा हजार रूपये ठरले. त्यानंतर आज दुपारी सापळा रचून संजय पटेल यास दहा हजार रूपये स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक नरेंद्र पवार, निरीक्षक उज्ज्वलकुमार पाटील, हवालदार सचिन गोसावी, प्रकाश डोंगरे, अजय गरुड, प्रणय इंगळे यांनी ही कामगिरी केली.

या बाबत दैनिक सकाळच्या राजकीय वेब पोर्टल सरकारनामा ने वृत्त दिले आहे. 

https://www.sarkarnama.in/nashik-adhikari/anti-corruption-bureau-arrests-brother-bjp-mla-accepting-bribe-nashik-73449

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.