सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना अटक

सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना अटक
नाशिक : नाशिकमध्ये आदिवासी विकास विभागातील सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेतांना अटक केली आहे. भिला देवरे असे सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्याचे नाव आहे. नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सदरची कारवाई केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आदिवासी आश्राम शाळांना साबण, तेल, आदी वस्तूचा पुरवठा करणारा ठेकेदार म्हणून व्यवस्थापक तक्रारदार काम करतात. यामध्ये त्यांनी  आदिवासी आश्राम शाळांना पुरवठा केलेल्या वस्तूचे ३० लाख ५९ हजार रुपयांचे बीलआदिवासी विकास भवन ,नाशिक येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय येथे सादर केले होते. सदरचे बील मंजूर करण्यासाठी सहाय्यक प्रकल्प अधिकारी भिला शंकर देवरे यांनी सदर बिलाच्या पाच टक्के अर्थात १ लाख ५० हजार रुपयांची मागणी केली. त्यातील तडजोडी अंती ५० हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानंतर सदर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार असता विभागातील अधिकाऱ्यांनी सापळा रचून भिला देवरेला रंगेहाथ पकडले असून अटक करण्यात आली आहे.
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.