जिल्हास्तरीय बुद्धिबळ: स्पर्श खंडेलवाल, विजय लोखंडे, आलीया पटेल विजयी

नाशिक : बॉटविनिक चेस स्कूल व चेस विकी डॉट कॉम यांच्या संयुक्त विद्यमाने कु .ईश्वरी शेलार हिच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय जलद बुद्धिबळ स्पर्धेत  खुल्या गटात स्पर्श खंडेलवाल , महिला गटात आलीया पटेल, तर जेष्ठ नागरिक गटात विजय लोखंडे  यांनी विजय मिळवला. या स्पर्धा देशस्थ ऋग्वेदी संस्थेच्या ऋग्वेद सभागृहात आयोजित करण्यात आल्या होत्या.

बॉटविनिक चेस स्कूलचे सुनील शर्मा सर व सदनी लेखापाल विनय बेळे यांच्या अभिनव कल्पनेतून सदर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध वयोगटात सुमारे १७५  स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेचे पंच म्हणून मंगेश गंभीरे यांनी काम बघितले.

स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे :

सात वर्षाखालील गट :

विजयी : तनिष्क महाले, द्वितीय : शर्वरी सांगळे, तृतीय : अपूर्व वाघचौरे

नऊ वर्षाखालील गट :

निधी पुजारी विजयी, तनिश येवले व्दितीय , श्रीहरी कुलकर्णी  तृतीय

अकरा वर्षाखालील गट :

सिया कुलकर्णी  विजयी, इंद्रजीत जोशी  व्दितीय, तन्मय सोनवणे तृतीय

तेरा वर्षाखालील गट :

अनुप डावरे विजयी, चैतन्य मते द्वितीय, सृष्टी रांका तृतीय

पंधरा वर्षाखालील गट :

वरुण वाघ विजयी, निखिल झाल्टे द्वितीय, अथर्व कुलकर्णी तृतीय

सतरा  वर्षाखालील गट :

श्रिया राठी विजयी, राज कुमावत द्वितीय, राज शिंदे तृतीय

महिला गट :

आलिया पटेल  विजयी, वेदांती झवेरी द्वितीय

जेष्ठ नागरिक गट :

विजय लोखंडे विजयी, रत्नाकर कसोदकर द्वितीय

खुला गट :

स्पर्श खंडेलवाल विजयी, धनश्री राठी द्वितीय, तन्मय महाले तृतीय, रेयांश शिंदे चतुर्थ, मयूर कस्तुरे पाचवा, विक्रम मालवणकर सहावा, श्रुती राठी सातवी.

पारितोषिक वितरण समारंभ भाजपाच्या महिलाशाखा उपाध्यक्ष वैशाली शाह यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी बॉटविनिक चेस स्कूलचे विनय बेळे, सुनील शर्मा, मंगेश गंभीरे, विनोद भागवत, विनायक वाडिले, सचिन निरंतर, समीर शेलार, विकी ठाकूर, सचिन व्यवहारे, सचिन सांगळे, विक्रम माळवणकर, डॉ. रेखा जाधव , संजय वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.