ट्राफिक पोलिसांना मिळाले व्हिडियोचे बळ : बॉडी वॉर्न कॅमेराचे वाटप

ट्राफिक पोलिसांना मिळाले व्हिडियोचे बळ : बॉडी वॉर्न कॅमेराचे वाटप

नाशिक मधील वाहतूक पोलिसांना आता कॅमेराचे बळ मिळाले आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आणि पोलिस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांच्या उपस्थितीत पाच   बॉडी वॉर्न कॅमेराचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे आता पोलिसांन सोबत हुज्जत घालेनअवघड  होणार आहे. पोलीस कर्मचारी वर्गावर होणारे हल्ले आणि नियम तोडून मारहाण करणारे आता या कॅमेरात कैद होणार आहे.

वाहतूक पोलिसांशी बाचाबाची करताना किंवा हुज्जत घालताना यापुढे दहा वेळा विचार करा.. यंत्रणेत पारदर्शकता यावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.नेहमीच्या वॉकी-टॉकी आणि लवाजमाशिवाय पोलिसांना  वायफाय कॅमेराही सोबत बाळगावा लागणार आहे. या कॅमेऱ्यात रस्त्यावरील पोलिसाचं प्रत्येक वाहनचालकांसोबतचं संभाषण रेकॉर्ड केलं जाईल आणि त्याचा पुरावा म्हणून उपयोग होईल.

त्यामुळे एखादा व्यक्ती पोलिसांशी जे काही संभाषण किंवा अरेरावी करेल ती सगळी रेकॉर्ड होऊन कंट्रोल रुमला जाईल. कायदेशीर कारवाईसाठी पुरावा म्हणून रेकॉर्ड केलेली माहिती ग्राह्य धरली जाणार आहे.सुरुवातीला शहरात ०५ कॅमेऱ्यांची चाचणी घेतली जाणार आहे. नंतर लगेच १०० नवीन कॅमेरे सरकार देणार आहे . या कॅमेऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओ क्लिप एडिट करता येणार नाही, जेणेकरुन छेडछाडीची शक्यता कमी असेल, असं वाहतूक विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.

या कॅमेऱ्यामुळे वाहतूक पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांना आळा बसेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. मागील वर्षी वाहतूक पोलिस विलास शिंदे यांचा तरुणांच्या मारहाणीत मृत्यू झाला होता.

नाशिक येथे झालेल्या हल्ल्याचा व्हिडियो येथे पहा : क्लिक करा https://youtu.be/dqxgELWfRV8

हेल्मेट जनजागृती रॅलीमध्ये पालकमंत्र्यांचा सहभाग

रस्ते अपघातापासून सुरक्षिततेसाठी दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर प्राधान्याने करावा असा संदेश देणाऱ्या हेल्मेट जनजागृती रॅलीचा शुभारंभ राज्याचे जलसंपदा, वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केला.

पोलीस कवायत मैदान येथे झालेल्या या कार्यक्रमाला आमदार बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी, पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल,  पोलिस उपायुक्त पाटील, शासकिय अधिकारी कर्मचारी, विद्यार्थी, मोटार सायकल रायडींग क्लब, विविध संस्था, नागरीक  तसेच सर्व प्रमुख शासकिय अधिकारी उपस्थित होते.

 दुचाकीस्वारांमध्ये हेल्मेटची जनजागृती करण्यासाठी नाशिक पोलिस आयुक्त कार्यालयाच्यावतीने  आयोजित या रॅलीचा पोलिस कवायत मैदान, गंगापूर रोड, कॉलेज रोड, त्र्यंबक रोड मार्गे गोल्फ क्लबवर समारोप झाला.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.