महाराष्ट्र राज्य पोलीस शरीर सौष्ठव ( Body Building) संघ निवड उद्या नाशिक मध्ये

अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धांमध्ये यावर्षी प्रथमच शरीर सौष्ठव या क्रीडा प्रकाराचा समावेश झाला आहे. सदर स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील एकूण 13 पोलीस घटकांमधील खेळाडूंमधून राज्य पोलीस संघ निवडला जाणार आहे. ही निवड चाचणी उद्या दि.7.9.18 रोजी दुपारी 1 वाजता रावसाहेब थोरात सभागृह, गंगापूर रोड नाशिक येथे होणार आहे. आज सकाळपासूनच राज्यभरातून विविध पोलीस घटकांचे संघ नाशिक शहर पोलीस मुख्यालयात दाखल होत आहेत.Body building selection committee nashik police nashik news 2018

पोलीस मुख्यालयात खेळाडू व व्यवस्थापक यांची निवासाची व भोजनाची व्यवस्था केलेली आहे. सदर निवड चाचणीची जय्यत तयारी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात सुरू आहे. दुपारी 1 वाजता नाशिक शहर पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल यांच्या हस्ते या निवड चाचणीचे उद्घाटन होईल.Body building selection committee nashik police nashik news 2018

या निवड चाचणीचा पहिलाच मान नाशिक शहराला मिळाल्यामुळे शहर आयुक्तालयात उत्साहाचे वातावरण आहे. या निवड चाचणीतून अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धेसाठी निवडल्या जाणाऱ्या खेळाडूंना मा.पोलीस आयुक्तांच्या हस्ते सन्मानित करून शुभेच्छा दिल्या जाणार आहेत.Body building selection committee nashik police nashik news 2018
सदर निवड चाचणीसाठी पंच म्हणून पोलीस महासंचालक कार्यालयाकडून नागपूर पोलीस आयुक्तालयातील पोलीस नाईक अभिषेक कारिंगवार हे काम पाहणार आहेत. ही निवड चाचणी पाहण्यासाठी नाशिककरांनी उपस्थित राहावे असे आवाहन नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने करण्यात येत आहे.

Body building selection committee nashik police nashik news 2018
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.