नाशिकमध्ये भाजपला ३३% मते, शिवसेनेला २५%

नाशिक : नाशिक महापालिका निवडणुकीत नाशिककरांनी भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमताचा कौल देताना दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनेला पसंती दिली आहे. सर्वाधिक ६७ एवढे संख्याबळ असलेल्या भाजपला ३२.६६% मते मिळाली आहेत तर ३५ जागांसह शिवसेनेला २५.८०% मतदारांचा जनाधार लाभला आहे. 

तसेच २०१२ साली झालेल्या निवडणुकीत ४० जागांसह मोठा पक्ष ठरलेल्या मनसेला यावेळी १०% मतदारांनी पाठींबा दर्शवला असला तरी त्यांच्या केवळ ५ उमेदवार निवडून येवू शकले आहेत. त्याचप्रमाणे अपक्ष आणि इतर पक्षांच्या उमेदवारांना १३.९४% उमेदवारांना मतदारांनी आपली मते दान केली आहेत. तर कॉंग्रेस राष्ट्रवादीला मतदारांनी पूर्णपणे झीद्कार्ल्याचीच स्थिती दिसून येत आहे. दोघांना अनुक्रमे ४.७३% आणि ६.२९% मते मिळविण्यात यश मिळाले आहे.

यापूर्वी नाशिक महानगरपालिकेत कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळविता आलेले नवते मात्र यावेळी भाजपने १२२ पैकी ६६ जागा मिळवत एकहाती सत्ता मिळवली आहे.

नाशिक महानगरपालिकेसाठी एकूण १० लाख ७३ हजार ४०८ मतदारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६ लाख ६१ हजार १९९ मतदारांनी मतदान केले. चार सदस्यीय प्रभाग रचना असताना एका मतदाराने ४ उमेदवारांना मतदान केले आहे. त्यानुसार एकूण २६ लाख ४४ हजार ७९६ एवढे मते होतात. त्यानुसार ही आकडेवारी आणि त्यानुसार मतदानाची टक्केवारी काढण्यात आली आहे. त्यानुसार भाजपला ३२.६६% म्हणजेच ८ लाख ५३ हजार ३५८ एवढे संख्याबळ मिळाले आहे. तर त्या खालोखाल शिवसेनेला २५.८०% म्हणजेच ६ लाख ७४ हजार १५२ असे संख्याबळ प्राप्त झाले आहे.

‘नोटा’ला नाशिककरांची पसंती

नाशिक मध्ये बऱ्यांच प्रभागात लक्षात येईल एवढ्या संख्येत मतदारांनी नोटाचा वापर केलेला आकडेवारीतून दिसून येत आहे. तब्बल ७६ हजार २७० मतदारांनी म्हणजेच २.९२% मतदारांनी एकही उमेदवार लायक नाही अशा विचार करून नोटाचा वापर केला आहे. प्रभाग क्रमांक २० ब आणि २० क मध्ये अनुक्रमे १३२० आणि १३५२ अशा संखेत सर्वाधिक मतदारांनी नोटा बटनचा वापर केला आहे. तेथे सीमा ताजने आणि संगीता गायकवाड नगरसेविका निवडून आल्या आहेत. तसेच प्रभाग क्रमांक ३१ मध्ये सर्वच जागांसाठी मोठ्याप्रमाणात नोटाचा वापर झाला आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.