कमी नगरसेवक निवडून आले — महाजन

बहुमत मिळाले तरी उमेदवार कमी निवडून आले – महाजन
नाशिक : नाशिक महानगरपालिका निवडणूकीत भाजपला ८० पेक्षा जास्त जागा मिळतील अशी आशा होती. मात्र आपल्याच लोकांनी आपला मोठा विजय रोखला. पक्षाला बहुमत जरी मिळाले असले तरी कमी उमेदवार निवडून आल्याचे जलसंपदा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले आहे.


नाशिक महापालिकेतील भाजपचे विजयी उमेदवार तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये निवडून आलेल्यांचा सत्कार सोहळा काल (दि.२४ फेब्रुवारी) वसंतस्मृती कार्यालयात  आयोजिण्यात आला त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ना.महाजन बोलत होते. व्यासपीठावर पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल, विभागीय संघटनमंत्री किशोर काळकर, प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते, सुनील बागूल, प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष आ.बाळासाहेब सानप, आ.देवयानी फरांदे,आ.सीमा हिरे, आ.अपूर्व हिरे, विजय साने, सतीश कुलकर्णी, संभाजी मोरूस्कर, प्रशांत जाधव, नाना शिलेदार, गोपाळ पाटील, प्रदीप पेशकार, महेश हिरे, रोहिणी नायडू, अनिल भालेराव, पुष्पा शर्मा, सुजाता करजगीकर, भारती बागूल, प्रशांत आव्हाड, संजय गालफाडे, सचिन महाजन आदी उपस्थित होते.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.