भाजपाची यादीत खाडाखोड ऐनवेळी प्रवेश

भाजपाची यादीत खाडाखोड ऐनवेळी प्रवेश 

नाशिकमध्ये युतीत दुरावा निर्माण झाल्याने सर्वांचे लक्ष प्रथम भाजपाकडे होते. तर दुसरे शिवसेनेकडे होते. सर्वाधिक इच्छुक भाजपाकडे दाखल झाले होते. मात्र अंतर्गत निकष ठरविले गेले आणि पक्षात नवीन प्रवेश केलेल्या अनेकांना तिकिटे दिली गेली. यामध्ये भाजपाचे नेते गिरीश महाजन सतत यादीत बदल करत होते. तर सर्वे करून आम्ही यादी तयार केली असे भाजपाने सांगितले. मात्र यादी घोषित केली नाही.शेवटी ठरलेल्या उमेदवारांना एबी फोर्म दिले गेले. त्यानंतर भाजपात स्फोट झाला. अनेक वर्ष भाजपात काम करत असलेल्या अनेकांना तिकीट नाकारले गेले. त्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले होते. असंतोष इतका होता की विद्यमान आमदार आणि शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांना सार्वजनिकरीत्या नाराज कार्यकर्त्यांनी अश्लाघ्य भाषेत शिवीगाळ केली. तर सर्वानीच पैसे घेऊन उमदेवारी दिली असा आरोप केला. त्यामुळे भाजपा कार्यालय काही काळ आखाडा बनले होते. ही परीस्थिती पाहून पालकमंत्री गिरीश महाजन यांनी काढता पाय घेतला. त्याच्या मागोमाग सानप सुद्धा येथून लपत निघून गेले. दुसरीकडे पत्रकारांना भाजपची यादी दिली गेली. यात बदल केला होता ती सुद्धा खाडाखोड केलेली फुटली त्यामुळे अनेकांचा संताप अनावर झाला. उभे राहिलेले कसे निवडून येतात ते पाहून घेऊ आणि पदाधिकारी विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.