#नाशिक : व्हिडीओ प्रकरणी भाजपा विरोधात कॉंग्रेसची तक्रार

नाशिक : महानगरपालिका निवडणुकीत नाशिक भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी २ लाख रूपये प्रती उमेदवारशी रक्कम घेऊन उमेदवारी दिल्याचे २ व्हिडीओ समाज माध्यमातून पसरल्यानंतर या बाबत लाच घेतल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी नाशिक शहर (जिल्हा) काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष शरद आहेर यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे. टि.व्ही चॅनल, वर्तमान पत्रे आणि वेब पोर्टलवर झळकलेल्या बातम्या यांचा हवाला कॉंग्रेसतर्फे देण्यात आला आहे.

याप्रकरणी नाशिकमधील एका आमदार आणि पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांवरून हा प्रकार घडल्याचे सत्य समोर येत असून जर पक्षाच्या साहित्यासाठी पैसे घेतले असतील तर प्रत्येक उमेदवारांच्या ८ लाख खर्च मर्यादा मधुन २ लाख रुपये खर्च कमी करून सदरचे २ लाख खर्चामध्ये दाखवावे अशी विनंतीही कॉंग्रेसतर्फे करण्यात आली आहे. या बाबत अधिक चौकशी करून आचारसंहितेचा भंग झाला असेल तर त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा असेही या निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान या सर्व प्रकरणात पक्षाची बदनामी करून राजकारण करण्यासाठी हा कात रचण्यात आल्याची प्रतिक्रिया आमदार देवयानी फरांदे यांनी दिली आहे. हे २ लाख रुपये चेक च्या स्वरूपातही स्वीकारण्यात येणार असून उमेदवारांच्या १० लाख खर्च मर्यादेतून ही रक्कम ग्राह्य धरण्यात येणार असल्याची माहिती फरांदे यांनी दिली. 

 

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.