सरकारच्या मर्जीने गुन्हे दाखल करुन सध्या विरोधकांना संपवण्याचे काम – विरोधी पक्षनेते विखे पाटील

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत उपोषणbjp government file wrong police cases against opposition leaders members

नाशिक : नगर जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा कोणत्या ही कामाची नसून ती अपयशी ठरली आहे. त्यामुळे नगर जिल्हा मोठ्या प्रमाणात अवैध शश्‍त्र बाळगणाऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जात आहे. मात्र हे सर्व माहित असून सुद्धा पोलिसांनी काहीच कारवाई केलेली नाही. तर दुसरीकडे सरकारच्या मर्जीने गुन्हे दाखल करुन सध्या विरोधकांना संपवण्याचे काम सरकारने सुरु केले आहे असा आरोप आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली देशात शांतता व सामाजिक सोलखा रहावा यासाठी काँग्रेस पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपवास आंदोलन करण्यात आले आहे.bjp government file wrong police cases against opposition leaders members

विरोधी पक्षाच्या आमदारांवर कारवाई केली जात असल्याचा, गंभीर आरोप विखे पाटील यांनी यावेळी केला. विरोधी पक्षाच्या आमदारावर कारवाई करण्याआधी चौकशी करण्याची गरज होती. तसेच जनतेचा दबाव वाढल्याने सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना अटक करावी लागली आहे. अहमदनगरमधील पोलीस यंत्रणा कुचकामी असल्याचे या आधीच सिद्ध झाले आहे. राज्यात जातीय तेड निर्माण होण्यासाठी भाजपची फूस असल्याचा आरोपही यावेळी विखे पाटील यांनी केला.

विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या आंदोलनात केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. देशपातळीवर सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न भाजप व रास्वसंघामार्फत चालले असून, त्यामुळे सामाजिक सलोखा व शांततेला धोका पोहोचत आहे. महाराष्टÑातील दंगलीत मिलींद एकबोटे व संभाजी भिडे यांचा सहभाग उघड होवून सरकारने त्यांच्या विरोधात कोणतेही पावले उचलली नाहीत असा आरोपही यावेळी करण्यात आला आहे.

या आंदोलनात आमदार निर्मला गावीत, डॉ. सुधीर तांबे, साक्रीचे आमदार धनाजी अहिरे, माजी आमदार जयप्रकाश छाजेड, शोभा बच्छाव, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष शरद अहेर, हेमलता पाटील, नानासाहेब बोरस्ते, वत्सला खैरे, अश्विनी बोरस्ते, आशा तडवी, आर. आर. पाटील, विमल पाटील, रईस शेख, राजेंद्र मोगल, शैलेश कुटे, यशवंत पाटील, बळवंत गोडसे, राजेेंद्र मोगल यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

आपला Whats App ग्रुप आहे आमचा 8830486650, 9689754878 दोन्ही नंबर सेवा करा नाशिकच्या बातम्या मिळावा !

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा !

Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.