करवाढ प्रकरण : महापालिकेत मोठा गोंधळ; राजदंड पळवण्याचा प्रयत्न

करवाढ प्रकरण : महापालिकेत मोठा गोंधळ; राजदंड पळवण्याचा प्रयत्न

नाशिक : सत्ताधारी भाजपाने नाशिक महापालिका पाणी आणि घर पट्टी कर वाढल्यामुळे आज नाशिक महापालिका महासभेत विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला आहे. हा गोंधळ इतका वाढला की विरोधक असलेल्या शिवसनेने राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. सुमारे १० मिनिटे हा गोंधळ सुरु होता. त्यात भाजपाच्या महापौर असलेल्या रंजना भानसी यांनी सुद्धा आपला मुद्दा योग्य ठरवत, महासभा तहकूब केली आहे.

आज जेव्हा महासभा सुरू झाली तेव्हा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्यासह शिवसेना , राष्ट्रवादी आणि  कॉंग्रेसच्या सदस्यांनी कर दरवाढीबाबत दिलेल्या पत्राचे वाचन करण्याची मागणी लावून धरली होती.मात्र  महापौर रंजना भानसी यांनी महासभेत कर वाढीसंदर्भातील प्रस्ताव सादर झालेला नाही. त्यामुळे या निर्णयावर   चर्चा शक्य नाही असे ठामपणे सांगितले, तर आजच्या म्हसाभेतील विषयपत्रिकेतील विषय वाचण्याचे आदेश नगरसचिवांना दिले. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले आणि संतप्त झालेल्या विरोधी सदस्यांनी करवाढ रद्द झालीच पाहिजे…नही चलेगी नही चलेगी दादागिरी नही चलेगी अशा घोषणा देत सदस्य हौदात उतरले होते.

काही सदस्यांनी महापौरांच्या व्यासपीठावर धाव घेत राजदंड पळविला. यामुळे एकच गोंधळ उडाला. घोषणाबाजीने सभागृह दणाणून गेले, गोंधळ अधिकच वाढल्याने महापौर रंजना भानसी यांनी सभेतील सर्व विषय मंजूर करत राष्ट्रगीत सुरू केले. यानंतर विरोधकांनी घोषणाबाजी करत सभागृह सोडले आहे. त्यामुळे आज कोणतेही काम न होता महासभा पार पडली आहे.स्थायी समितीने घरपट्टीत १८ टक्के आणि पाणीपट्टीत पाच वर्षांसाठी सुमारे १२० टक्के दरवाढीचा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यामुळे नागरिक नाराज आहे. तर शिव्सेनेंसह अन्य पक्षांनी या निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशारा दिला होता.  तर दुसरीकडे राष्ट्रवादी पक्ष,प्रहार संघटना , आम आदमी पार्टीनेही स्वाक्षरी मोहीम व निदर्शने करत मनपाच्या निर्णयाचा निषेध नोंदविला आहे.

विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, शिवसेना

झालेली कर वाढ ही फार चुकीची असून, जे नागरिक नियमित कर भरत आहेत त्यांनाच भुर्दंड का पडतोय, फक्त सत्ता आणि संख्या बळाचा उपयोग करत हा निर्णय घेतला आहे. शिवसेना कदापीही ही करवाढ लागू होवू देणार नाही.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.