भुजबळ यांनी अधिवेशनात नसतांना जोरदार कामगिरी :५५ तारांकीत प्रश्‍न ३५ लक्षवेधी सुचना 

हिवाळी अधिवेशन नुकतेच पूर्ण झाले आहे. जसे बसे १० दिवस हे अधिवेशन झाले. अनेक आमदारांना तर त्यांचे प्रश्न सुद्धा मांडता आले नाहीत. मात्र इडी च्या आदेशाने तुरुंगात असलेल्या छगन  भुजबळ यांनी तेथे नसताना जोरदार काम केले आहे. त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील प्रश्न तर विचारले आहेत सोबत राज्यातील मह्त्वाचे प्रश्न विचारले आहेत. नाशिक जिल्हा आणि राज्याच्या महत्वाच्या प्रश्‍नांवर पंचावन्न ऑनलाईन तारांकीत प्रश्‍न पाठवले   आहेत. भुजबळ यांचे  स्वीय सहाय्यक दीपक गांगुर्डे यांच्यामार्फत नियम 105 अन्वये पस्तीस लक्षवेधी सुचना मांडल्या  आहेत. त्यामुळे विधानसभेत असून सुद्धा  अनेकआमदारांना प्रश्न विचारता येत नाहीत त्यामुळे फक्त १० दिवसात त्यांनी केलेल्या या कामामुळे सर्व आश्चर्य व्यक्त करत आहेत. पहा त्यांनी विचारलेले  प्रश्न विधानसभेत पंच्चावन्न तारांकीत प्रश्‍न व पस्तीस लक्षवेधी सुचना  समाविष्ट आहेत. महत्वाच्या प्रश्‍नांवर पंचावन्न ऑनलाईन तारांकीत प्रश्‍न पाठवले.

 • मराठी भाषा संवर्धनासाठी स्वतंत्र विद्यापीठ,

 • कोकणातील नागरीकांसाठी जलवाहतुक,

 • जेनेरीक औषधांची गुणवत्ता,

 • गंगापूर धरणातील बोट क्‍लबमध्ये उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध करणे,

 • दिल्ली हाटच्या धरतीवर गंगापुर गोवर्धनला कालाग्राम उभारणे,

 • पालखेड पाटबंधारे प्रकल्पातील पाण्याचा अवाजवी वहनव्ययाचा शेतीच्या सिंचनावर परिणाम,

 • सरळसेवा पदोन्नत उपजिल्हाधिकाऱ्यांवर होणारा अन्याय,

 • नाशिक विमानतळावर विमानसेवा कार्यन्वित करणे,

 • सिंहस्थासाठी उभारलेले घाट व सुविधांचे जतन करणे,

 • नाशिक टर्मीनलचे काम सुरु करणे,

 • राज्याच्या ग्रामीण भागातील सांडपाणी व्यवस्थापन,

 • पुणेगाव-दरसवाडी कालवा प्रवाही करणे,

 • कांद्याचे निर्यातमूल्य,

 • जातप्रमाणपत्र असलेल्या कुटुंबातील सदस्यास पडताळणीतुन वगळणे,

 • ठाणे ते वडपे उड्डानपुलाचे रेंगाळलेले काम,

 • नाशिक शहरातील बससेवेच्या कमी केलेल्या फेऱ्या,

 • बसस्थानकांची दुरावस्था झाल्याने बीओटी तत्वावर त्याचा विकास करणे,

 • महात्मा फुलेंचे राहते घर संरक्षीत स्मारक म्हणुन घोषित करणे

 • येवला मतदारसंघाशी संबंधीत मुक्तीभूमीवर बार्टीच्या अंदाजपत्रकातील रेंगाळलेली कामे,

 • मुक्तीभूमिला पर्यटनस्थळ व तीर्थस्थळाचा दर्जा,

 • पैठणीच्या सुताला ‘जीएसटी’तुन वगळणे,

 • नवीन आरोग्य संस्थांची बांधकामे,

 • जलयुक्त शिवाराच्या कामांना गती देणे,

 • येवला व लासलगावच्या शेतकऱ्यांचे कांदा चाळींचे प्रस्ताव मंजुर करणे, 41 गावांची पाणीपुरवठा योजना,

 • औद्योगिक वसाहतीसाठी निधी,

 • भटके विमुक्त विद्यार्थी वसतिगृह,

 • येवला व विंचुर प्राथमिक आरोग्य केंद्र,

 • भटक्‍या जमातींसाठी मुक्त वसाहत,

 • तलाठ्यांची निवासस्थाने,

 • इंदिरा आवास योजना,

 • खनिज विकास निधीतील कामे,

 • अल्पसंख्यांक, भटक्‍यांना उच्च शिक्षणासाठी साह्य,

 • देवना सिंचन प्रकल्प, (येवला), मेगा फुडपार्क (सिन्नर)

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.