छगन भुजबळ लढवय्या नेते, लवकरच बाहेर येतील : राज्यमंत्री दिलीप कांबळे

शरद पवारांच्या चुप्पी बाबत राजकीय चर्चांना उधाण

पुणे/नाशिक : छगन भुजबळ हे लढवय्या नेते असून त्यांना गेल्या दोन वर्षापासून कायद्याच्या कचाट्यात अडकविण्यात आले आहे. मात्र आता तो कलमच रद्द झाल्याने छगन भुजबळ यांना लवकरच जामीन मिळेल.

ते लवकरच आपल्यात दिसतील अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो असे राज्याचे समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे म्हणाले आहेत.

Chhagan Bhujbal a fighter, may walk out of jail soon: Maharashtra Minister Dilip Kamble छगन भुजबळ समता परिषद लढवय्या नेता

ते आज महात्मा जोतिराव फुले यांच्या १२७ व्या पुण्यतिथी निमित्ताने फुले वाडा पुणे येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता पुरस्काराच्या वितरण सोहळ्याप्रसंगी बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व देशाचे केंद्रीय मानवसंसाधन राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह यांच्या हस्ते महात्मा फुले समता पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक, लेखक डॉ.मा.गो.माळी यांना प्रदान करण्यात आला.

छगन भुजबळ यांनी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून महात्मा फुले यांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवले आहे. ते संघर्ष करणारे नेते असून न्याय हक्कासाठी संघर्ष करण्यासाठी ते बाहेर असण्याची गरज असल्याचे कांबळे यांनी सांगितले.

भुजबळांबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांबाबत बरीचशी चुप्पी साधल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यांना झालेली अटक आजची अवस्था हे तर सोडाच त्यांना मिळू शकणाऱ्या जामीनाबाबत शरद पवार काहीही बोलले नाहीत.

समता परिषदेच्या माध्यमातून देशाचे राजकारण हलविण्याची ताकद भुजबळांमध्ये आहे असे म्हटले जाते. मात्र समता परिषदेच्याच कार्यक्रमात शरद पवार भुजबळांना विसरले की काय असे वाटून गेल्याची चर्चा भुजबळ समर्थकांसह राजकीय वर्तुळात आहे.

आमचे फेसबुक पेज लाईक करा.

https://www.facebook.com/NashikOnWeb/

यावेळी केंद्रीय मानवसंसाधन राज्यमंत्री ना.उपेंद्र कुशवाह, समता परिषदेचे कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळे, बापू भुजबळ, आ.पंकज भुजबळ, आ.जयवंतराव जाधव, आ.जयदेव गायकवाड़ तसेच समता परिषदेचे पदाधिकारी व राज्यभरातून आलेले समता सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.