भुजबळांचा दमानियांविरोधात ५० कोटींचा मानहानीचा दावा

नाशिक : आर्थर रोड तुरुंगात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगाची हवा खात असलेल्या छगन भुजबळांवर अंजली दमानिया यांनी व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचे आरोप केले होते. त्याविरोधात भुजबळांनी दमानिया यांच्यावर ५० कोटींचा मानहानीचा दावा केला आहे.
दमानिया यांनी भुजबळांवर केलेले आरोप (इथे क्लिक करा)
कुठल्याही पुराव्यांशिवाय मानहानी करणारे आरोप करून ते सोशल मीडिया आणि प्रसार माध्यमांना पुरवण्यात आल्या आहेत. दमानिया यांनी केलेले सर्व आरोप भुजबळांनी फेटाळले आहेत. सामान्य कैद्याला ज्या सुविधा मिळतात आणि कोर्टाच्या आदेशानुसारच छगन भुजबळ यांना घरचे जेवण दिले जात असल्याची माहिती भुजबळांच्या नोटीसीत देण्यात आली आहे.
अनेक दिवसांपासून दमानिया आणि भुजबळ वाद सुरू आहे. अंजली दमानिया भुजबळांवर आरोप करण्याची कुठलीही संधी सोडत नसल्याचे चित्र अनेक दिवसांपासून आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.