डॉ. भीष्मराज बाम अनंतात विलीन

क्रीडा मानसोपचार तज्ञ डॉ. भीष्मराज बाम आज अनंतात विलीन झाले. त्यांचा सहवास लाभलेल्या क्रीडा क्षेत्रातील अनेक हस्ती यांनी यावेळी साश्रुपूर्ण निरोप दिला. अत्यंत भावपूर्ण वातावरणात त्यांच्यावर नाशिक अमरधाममध्ये अंतिमसंस्कार करण्यात आले. यावेळी अनेकांना अश्रू अनांवर झाले. डॉ. बाम यांचे ज्येष्ठ पुत्र अभिजित बाम हस्ते सर्व विधीवत कार्यक्रम करण्यात आले.

रविवारी १४ मे रोजी  सायंकाळी ६ वाजता महात्मा नगर  हॉलमध्येच शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

देशातील अनेक खेळाडूंचे आधार स्तंभ असलेल्या डॉ. भीष्मराज बाम यांचे १२ मे रोजी  सायंकाळी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. नाशिकमध्ये शुक्रवारी संध्याकाळी खेळाडूंना मार्गदर्शन करत असतना त्यांना हृद्यविकाराचा तीव्र झटका आला. त्यात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे त्यांच्या निधनाची बातमी समजताच नाशिकसह संपूर्ण क्रिडा क्षेत्रावर शोककळा पसरली.

खेळाडूंच्या या भिष्मचार्याचे पार्थिव महात्मानगर नागरिक मंचच्या हॉलमध्ये सकाळी ८ ते १०:३० पर्यंत अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. नाशिकमधील त्यांचे मार्गदर्शन लाभलेले खेळाडू, स्वाध्याय परिवारात सक्रीय असल्याने अनेक स्वाध्यायींनी हजेरी लावली.

क्रिडा मानसोपचार तज्ञ, माजी पोलिस महासंचालक डॉ. भीष्मराज बाम (७८) यांचे निधन

श्रद्धांजली अर्पण करताना नेमबाज अंजली भागवत यांनी आपल्या प्रत्येक पदकात मला बाम सरांचा चेहरा दिसत असल्याचे म्हटले. आम्हा खेळाडूंना त्यांनी शून्यातून इथपर्यंत आणल आहे. स्वप्न बघण्याचे बळ त्यांनी आम्हाला दिले. त्यांनी दिलेले संस्कार, आमच्या खेळाला लावलेली शिस्त यांची जोपासना आम्ही अशीच करत राहू असेही अंजली भागवत यांनी म्हटले.

नाशिकचे पोलीस अधिकारी राहिलेले हरीश बैजल सर यांनी बाम सात आपल्यात नाहीत यावर अजूनही विश्वास बसत नसल्याचे सांगितले. त्यांनी पोलीस अकादमीत असतानाचा एक अनुभव सांगत अकादमीच्या संघाच्या चांगल्या कामगिरीचे श्रेय बाम सरांचेच आहे. डॉ. कलाम आणि डॉ. बाम हे दोघेही आपले आवडते काम करताना अंतरात विलीन झाले याचा अभिमान वाटतो असेही त्यांनी सांगितले.

नाशिक संघाचे ‘साई’ प्रशिक्षक विजेंदर सिंग यांनी नाशिकच्या खेळाडूंनी ऑलिम्पिक पदके आणून डॉ. भीष्मराज बाम यांचे स्वप्न पूर्ण करावे. आपण पदक मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत बाम सरांना हीच खरी श्रद्धांजली अर्पण करू असे खेळाडूंना आश्वस्थ करत खेळाडूंना आधार देण्याचा प्रयत्न केला.

यावेळी आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत, सुमा शिरूर, दीपाली देशपांडे, धावपटू कविता राऊत, मोनिका आथरे, डेरवणचे क्रीडा संघटक हरीश करमरकर, स्वाध्याय परिवाराच्या धनश्रीदीदी तळवलकर, श्रीनिवास तळवलकर, डॉ. प्राची पवार, उदय देशपांडे, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे, पोलीस उपायुक्त माधुरी कांगणे, सहायक पोलीस आयुक्त राजू भुजबळ, वरिष्ठ पोलीस अधिकारी हरिष बैजल यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी, अॅथलेटीक प्रशिक्षक विजेंद्रसिंग, किसन तडवी, नाशिक सायकलिस्टचे जसपालसिंग विरदी, महेंद्र महाजन, अभिनेता सुयोग गोरे, समीक्षक केशव उपाध्ये, महापौर रंजना भानसी, डॉ. हेमलता पाटील, आमदार बाळासाहेब सानप, आमदार सीमा हिरे, आमदार जयंत जाधव, निवृत्त सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, माजी महापौर यतिन वाघ, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जितू ठक्कर, धनंजय बेळे, विनायक रानडे, सचिन उषाविलास जोशी, एनडीसीएचे सचिव समीर रकटे, शेखर गवळी, ब्रिजमोहन चौधरी यांच्यासह विविध क्षेत्रतील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.