Baramati Sugar Nashik Corona बारामतीच्या साखरेने नाशिककरांचे तोंड होणार गोड

४ हजार ३८५ क्विंटल साखर मागविणार Baramati Sugar Nashik Corona

नाशिक : लाॅकडाऊन परिस्थितीत जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन दक्ष आहे. बारामती येथुन 4 हजार 385 क्विंटल साखर मागविण्यात येणार आहे. तसेच राज्यातील इतर जिल्ह्यातून डाळी व गोडेतेल मागविण्यात येणार आहे. Baramati Sugar Nashik Corona

राज्यासह देशभरात येत्या १५ एप्रिलपर्यंत लाॅकडाऊन आहे. करोना संसर्ग टाऴण्यासाठी लाॅकडाऊनचा कालावधीत वाढ होउ शकते असे बोलले जात आहे. सरकारने देखील त्या अनुषंगाने तयारी केली असून गोरगरिबांची उपासमार होऊ नये यासाठी अंत्योदय व प्राधान्यक्रम शिधापत्रिकाधारकांना तीन महिन्याचे राशन अगाऊ देत आहे.

तसेच लाॅकडाऊन कालावधीत जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा निर्माण होउन किंमती सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर जाऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे.

साखर, खाद्य तेल, डाळी याची कमतरता भासणार नाही यासाठी नियोजन केले आहे. बारामती येथुन 4 हजार 385 क्विंटल साखर माविण्याबाबत संबधित साखर कारखान्याचे व्यवस्थापन व ट्रान्सपोर्टर यांचेशी संपर्क साधून नियोजन करण्यात आले आहे.

घाऊक व किरकोळ व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधुन ठाणे, धुळे, लातुर, अकोला येथून डाळी, गोडेतेल मागविण्यात येणार आहे. शहर व जिल्ह्यात किराणा व जीवनाश्यक वस्तुंचा तुटवडा निर्माण होउन काळाबाजार होणार नाही याबाबत जिल्हा पुरवठा विभाग वाॅच ठेऊन आहे. Baramati Sugar Nashik Corona

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.