two year old boy आई चेंडू आणायला खाली उतरली, बाल्कनीतून तोल जाऊन दोन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

नाशिक: नाशिकच्या सातपूर परिसरातील शिवाजी नगर भागात एक दुर्दैवी घटना घडलेली आहे. दोन वर्षीय चिमुकल्याचा घराच्या बाल्कनीतून पडून मृत्यू झाला. गौरव शेवाळे असं या चिमुकल्याचं नाव आहे. बुधवारी (30 जुलै) सायंकाळी ही घटना घडलेली आहे. गौरव आईसोबत घरात क्रिकेट खेळत होता. मात्र, त्याचा बॉल अचानक बाल्कनीतून खाली पडला. त्यामुळे बॉल घेण्यासाठी आई खाली आली होती. दुसऱ्या मजल्यावर राहत असल्यामुळे आईला खाली येण्यासाठी थोडा वेळ लागला आहे.two year old boy

गौरव बाल्कनीतूनच खाली बघत होता. आई खाली बॉल घेत असतानाच गौरवचा अचानक बघता बघता तोल गेला आणि तो थेट खाली कोसळला आहे. यामुळे गौरवच्या छातीला जबर मार लागला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. गौरवला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. मात्र, डॉक्टरांनी गौरवला मृत घोषित केलं आहे. अचानक घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.two year old boy

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.