जुने नाशिक : गळा चिरून सराईत गुन्हेगाराचा खून

जुने नाशकातील नाशिक पुणे महामार्गजवळील बजरंगवाडी येथे एका सराईत गुन्हेगाराचा गळा चिरून खून करण्यात आला. रविवारी (दि. 10) रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली असून गजानन उर्फ गज्जू गावित असे या खून झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. Bajrang wadi murder gajanan gavit nashik crime news police

हॉटेल जवळ बसला असतांना हल्लेखोरांनी त्याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करत पसार झाले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

गजानन गावित वर हाफ मर्डर सह खून आणि इतरही गुन्हे नोंद होते. त्यामुळे पूर्ववैमस्यातून हा खून झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

गजाजन गावित हा गेल्या दोन ते तीन महिन्यापासून बजरंगवाडी सोडून दुसरीकडे राहायला गेला होता. आज भाच्याच्या वाढदिवसासाठी तो बजरंगवाडीत आला होता.

मुंबई नाका पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करीत मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवला. जिल्हा रुग्णालयात गज्जूच्या नातेवाईक आणि मित्रांनी गर्दी केली होती. भद्रकाली आणि सरकारवाडा पोलीस रुग्णालयात दाखल झाले होते.

नाशकात या नवीन वर्षात सहा खून पडले असून नाशिककरांच्यात भीतीचे वातावरण आहे.

Bajrang wadi murder gajanan gavit nashik crime news police
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.