महाराष्ट्र शासनातर्फे घेतली जाणारी बी एड सीईटी परीक्षा अर्ज भरण्यास १ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.बी एड होण्यासाठी सामाईक परीक्षा देणे अनिवार्य असते त्या अनुषंगाने सण २०१७-१८ या शैक्षणिक वर्षासाठी यंदा ५ एप्रिल पासून प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे, सदर सीईटी परीक्षा १३ व १४ मे रोजी नाशिक शहरातील केंद्रात घेतली जाईल . ४ मे पासून विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा प्रवेश पत्राची प्रिंट घेता येईल . या मुदतवाढीचा जास्तीत जास्त विद्याथ्यांनी लाभ घ्यावा.
मविप्रच्या शिक्षणशास्र् महाविद्यालयाच्या वतीने बी एड व एम एड सीईटी परीक्षेचे मोफत प्रवेश अर्ज भरून दिले जात आहेत. त्याचप्रमाणे १५ एप्रिलपासून महाविद्यालयात सीईटी मार्गदर्शन वर्ग देखील घेतले जात आहेत. तसेच एम एड सीईटी परीक्षा अर्ज भरण्यास २५ एप्रिल ते १५ मे पर्यंत मुदत आहे , याचा देखील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ चंद्रकांत बोरसे यांनी केले आहे.