सिडको : मागणीच्या पाच पट एटीएम मधून पैसे, बँकेला पैसे परत करा अन्यथा कारवाई  

मागणीच्या पाच पट एटीएम मधून पैसे, अनेकांनी केली लुट

सर्व घटना सीसीटीव्हीत कैद, पैसे परत करा अन्यथा कारवाई  

नाशिक : शहरात सिडको परिसरात असलेल्या अॅक्सिस बँकेच्या एटीएममधून चक्क पाच पट रक्कम निघत होती. हा सर्व प्रकार रात्री उशिरा सुरु झाला, २०० रु काढले तर चक्क २००० रु. येत होते. मशीनमध्ये झालेल्या चुकीच्य सेटिंगमुळे हा सर्व प्रकार झाला होता. बँकेच्या लक्षात येण्या आगोदर सिडको वासियांनी जबर गर्दी करत हजारो रुपये काढले होते. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून, त्याद्वारे आणि मशीनमधील एटीएमच्या नोंदीच्या आधारावर बँकेने हे पैसे पुन्हा मागितले आहेत, असे न केल्यास पोलिस कारवाई करण्यात येणार आहे.

सविस्तर वृत्त असे की, आपल्या देशात एखादया योजनेत पैसे गुंतवा आणि दाम दुप्पट मिळवा असे प्रकार घडून लाखो नागरिक फसविले गेले आहे. तर नाशिक शहरातील सिडकोत मात्र अॅक्सिस बँकेच्या एटीएममधून ग्राहक मागणीच्या चक्क पाच पट रक्कम मिळत होती. हा सर्व प्रकार पैश्या सोबत निगडीत असल्याने लगेच बातमी सिडकोत पसरली, तर  नागरिकांनी या ठिकाणी पैसे काढायला जबरदस्त गर्दी केली. संध्या काळी ८ नंतर सुरु झालेल्या या प्रकारात चार तासात लाखो रुपये लोकांनी काढले. आमत्र अखेर रात्री ११ वाजता पोलिस बंदोबस्तात एटीएम बंद करण्यात आले.

अॅक्सिस बँकेचे सिडकोतील विजयनगर येथे एटीएम आहे. बँकेने चार वाजता एटीएम मध्ये पाच लाख भरले. ग्राहकांनी एटीएम मधून रक्कम काढण्यास सुरुवात केली होती.एटीएम मशिन मध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने ग्राहकांना चुकून पाच पट रक्कम त्यांना मिळत होती. एका ग्राहकाने दोन हजार काढावयास गेले असता त्याला दहा हजार रुपये हातात आले, मग काय पाच पट पैसे देणाऱ्या या यंत्राची माहिती परिसरात समजताच ग्राहकांनी रक्कम काढण्यासाठी एकच गर्दी केली. एक ग्राहक अमोल गोलाईत हे  एटीएम मधून चार हजार रुपये काढायला गेले असता त्यांना वीस हजार रुपये मिळाले, अमोल ने घटनेची माहिती बँकेला दिली. बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक प्रवीण भिसे यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. अंबड पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर एटीएम बंद करण्यात आले. मात्र  या चार तासात सुमारे चार लाख रक्कम काढली गेली आहे.

एटीएम मध्ये असलेल्या सीसी टीव्ही तसेच ज्या खात्यावरून रक्कम काढण्यात आली ती माहिती घेऊन रक्कम वसुल केली जाणार आहे अशी माहिती बँकेच्या व्यवस्थापक भिसे यांनी दिली आहे. अथवा पोलिस कारवाई करू असा इशारा त्यांनी दिला आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.