Auto वीस तारखेपासून मीटर प्रमाणे भाडे, सविस्तर भाडेवाढ व तक्ता

शहरातील रिक्षा चालकांची मनमानी पाहता आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी रिक्षा चालक आणि नागरिकांना परवडेल असे मीटर दर ठरवून दिले आहेत. शहरातील सर्व रिक्षा आता २० डिसेंबर पासून मीटर प्रमाणे चालणार आहेत. तुम्ही शेअरिंग ने सुद्धा मीटरचा वापर करणार आहात. तर स्पेशल रिक्षा करतांना सुद्धा आता मीटर दर आकारले जाणार आहेत. शेअरिंग दर खाली इमेज फाईल मध्ये देत आहोत, तर स्पेशल मीटर दर देखील वेगळे दिले आहेत. (Auto)

नाशिक यांनी दि . २० . ०१ . २०१५ रोजी अॅटोरिक्षा साठी नवीन भाडे दर लागू केले आहे त्यानुसार पहिल्या कि . मी . साठी १४ . ०० रुपये व त्यापुढील प्रत्येक कि . मी . साठी १३ . ७५ रुपये असे दर निश्चित करण्यात आले आहे . योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाठी येणा – या ऑटोरिक्षांचे मिटर कॅलीब्रेशन दि . २१ . ०१ . २०१५ रोजी लागू झालेल्या नविन भाडे दराप्रमाणे केले जाते . नाशिक शहरातील सर्व ऑटोरिक्षांना इलेक्ट्रानिक मिटर बसविलेले असल्यामुळे प्रवाशांनी प्रवास करतांना मिटरवर दिसत असलेले भाडे अदा करावे .

तसेच ज्या प्रवाशांना शेअर – ए – रिक्षा प्रमाणे प्रवास करावयाचा आहे त्यांच्यासाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरण , नाशिक यांनी ५४ मार्गाना मंजुरी दिली आहे अशा मार्गावर पुढील कार्यपध्दती वापरुन भाडेदर निश्चित केले आहेत . दि . २० . ०१ . २०१५ रोजी मंजुर केलेले पहिल्या कि . मी . साठी १४ . ०० रुपये व त्यापुढील प्रत्येक कि . मी . साठी १३ . ७५ रुपये याप्रमाणे सदर मार्गाच्या एकूण अंतरा प्रमाणे येणारे भाडे प्रथमतः काढले जाते .

तसेच सदर वाहन चालक यांना या मार्गावर नंबरप्रमाणे उभे राहावे लागून आपला नंबर येण्याची वाट पहावी लागते तसेच एकाचवेळेस तीन प्रवासी मिळत नसल्यामुळे प्रत्येक प्रवाशाची वाट पहावी लागते त्यामुळे राज्य शासनाने नेमलेल्या मा . हकीम समितीने अशा शेअर – ए – रिक्षा मार्गासाठी ३३ % अतिरिक्त भाडे ठरविले आहे .

अशा पध्दतीने नविन भाडेदराप्रमाणे येणारे भाडे अधिक ३३ % अतिरिक्त भाडे असे एकूण भाडे नाशिक शहरातील मंजूर ५४ शेअर – ए – रिक्षा मार्गासाठी खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे . शेअर – ए रिक्षा मार्गावरील होणारे प्रवासाचे एकुण भाडे तिन प्रवाशांमधे विभागले जात असल्यामुळे प्रवाशांचा सुध्दा फायदा होतो .

स्पेशल मीटर दर पुढील प्रमाणे :

नाशिक ऑटो रिक्षाचे भाडे दरपत्रक – दि . २० / १ / २०१५ पासून लागू १७ पहिल्या र किमी अंतरास रु . १४ / यानंतरच्या प्रत्येक किमी अंतरास रु . १३ . ७५ बास केलेल अंतर हे १०० मिटरच्या टप्प्यात आहे . ४ ) प्रतिक्षा कालावधी प्रत्येक दोन मिनीटांसाठी २०० मिटरचे भाडे देय राहील रात्री १२ : ०० ते सकाळी ५ . ०० वाजेपर्यंत प्रवासासाठी २५ % एवढे अधिक भाडे देय राहिल .(Auto)

तर ६ ) लगेज चार्गस ६० सेमी x ४० से . मी . मापापेक्षा लहान ब्रीफकेस , हैण्डबंग अथवा सुटकेस शिवाय असणा – या प्रत्येक डागास रु . ३ , ०० प्रमाणे आकार द्यावा लागेल .

७ ) ०० . ४९ पैशांपर्यंतची रक्कम दुर्लक्षित केली असून ०० . ५० ते ७० . ९९ पैसे पूर्णाकात नजीकच्या रुपयात केले आहेत . ८ ) इलेक्ट्रॉनिक मिटर रि – कैलिनेशनसाठी ४५ दिवसांची मुदत राहील . ४५ दिवसांच्या आत मिटर रि – कैलिनेशन न केल्यास प्रति दिवसाच्या विलयासाठी १ दिवस परवाना निलंबन किंवा रु . ५० / – तहजोड शुल्क परत , कमाल तडजोड शुल्क रु . ५०० / – आकारण्यात येईल .(Auto)

NAshik Auto meter rates
शहरात कोठेही फिरा, मीटर प्रमाणे पैसे द्या,
मामाच्या मुलीशी लग्न करताय, थांबा डॉक्टर काय म्हणता आधी ते पहा मग निर्णय घ्या !
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.