भारतीय चिकित्सा पद्धतीच्या व्यवसाइकांची निमाचा राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव

गोल्फ क्लब मैदानावर दिनांक ८ ते १० मार्च या दिवसात नॅशनल इंटिग्रेटेड मेडीकल असोसिएशन अर्थात निमा या संघटनेच्यावतीने जिल्हा अंतर्गत आणि राज्यस्तरीय क्रिकेट क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याच्य शुभारंभप्रसंगी शहीद जवानांच्या कुटुंबीयांना सन्मानित करण्यात येणार आहे.

सदस्यांच्या अर्थात वैद्यकिय व्यवसायिकाच्या आरोग्यदायी स्वाथ्यच्या विचार करून जिल्ह्य अंतर्गत  क्रिकेट स्पर्धा ‘निमा करंडक’ या नावाने आयोजन गेल्या सहा वर्षापासून नाशिक निमा शाखा राबवित आहे. यावर्षी प्रथमच राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन निमा नाशिक शाखेकडून करण्यात आले असून यामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातील डॉक्टरांचे संघ नाशिक शहरात दाखल होणार आहेत.

या क्रिकेट महोत्सवाप्रसंगी पहिल्या दिवशी म्हणजे दिनांक ८ मार्च रोजी नाशिक जिल्ह्यातील तालुकास्तरीय डॉक्टरांच्या स्पर्धा होणार आहेत. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त माननीय श्री राधाकृष्ण गमे,  निमाचे राष्ट्रीय शाखेचे सह खजिनदार शैलेश निकम, निमा राज्य शाखेचे खजिनदार डॉ. भूषण वाणी, उपसचिव डॉ. अनिल निकम तसेच प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्‍त्या सभापती डॉ. हेमलता पाटील,  याची उपस्थिती लाभणार आहे. यावेळी नाशिक जिल्ह्यातील पुढील सहभागी होणार आहेत.यात निमा नाशिक, सातपूर, पाथर्डी, पंचवटी, दिंडोरी, पेठ, आयएमए, शिवगर्जना  लासलगाव.

महोत्सवाचा राज्यस्तरीय स्पर्धा या दिनांक ९ व १० रोजी आयोजित करण्यात आल्या असून त्यात यात नांदेड, नागपूर, शेवगाव, आंबेगाव–जुन्नर, राजगुरुनगर, शिरूर, शहापूर,बार्शी, बुलढाणा, शिरपूर-धुळे, परभणी विविध जिल्ह्याचे संघ सहभागी होणार आहेत. या  राज्यस्तरीय स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ सुधीर तांबे, निमा केंद्र शाखा अध्यक्ष  डॉ. विनायक टेंभुर्णीकर, खजिनदार डॉ. आशुतोष कुलकर्णी, राज्य शाखा अध्यक्ष जी एस. कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

दिनांक १० मार्च रोजी क्रीडा महोत्सवाच्या समारोपप्रसंगी परितोषिक वितरणासाठी पोलीस आयुक्त  विश्वास नांगरे पाटील, राज्य उत्पादन शुल्क विभाग , विभागीय उपायुक्त  श्री. प्रसाद सुर्वे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी विजेत्या संघाला विजेता संघाला चषक व ३१ हजार रुपये रोख आणि उपविजेत्या संघाला चषक व २१ हजार रुपये रोख व याबरोबरच उत्कृष्ट खेळाडूना विविध पारितोषिके देण्यात येणार आहेत.

या महोत्सवाविषयी माहिती देतांना, निमा नाशिकच्या अध्यक्षा डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी सांगितले की, धावपळीच्या जगात वैद्यकिय व्यवसायीकांचे ताणतणाव वाढत असून त्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे झाले आहे. या सोबतच  शारीरिक स्वाथ्यासाठी या स्पर्धाचे आयोजन संघटनेकडून सदस्यांसाठी करण्यात येत आहे. यासाठी राज्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून संघाचा नियमित सराव सुरु झाला आहे. अत्यंत उत्कंठावर्धक असे डॉक्टरांचे सामने नाशिककरांना प्रत्यक्ष बघावयास मिळणार आहेत.

 या महोत्सवाच्या आयोजनप्रसंगी समन्वयक डॉ. सुजित सुराणा, डॉ. दीपक पाटील, डॉ. वैभव गरुड, डॉ. संगीत लोंढे, हे जबाबदारी सांभाळत आहे. नाशिक निमाचे सचिव डॉ. वैभव दातरंगे, खजिनदार डॉ. प्रतिभा वाघ, डॉ. तुषार सूर्यवंशी, डॉ. राहुल पगार, डॉ. ललित जाधव, डॉ. वेंकटेश पाटील, डॉ.मनीष हिरे हे आयोजनाचे काम बघत आहेत. त्यासोबतच निमा महिला फोरमच्या अध्यक्षा प्रणिता गुजराथी, दीप्ती बडे यांनी सहकार्य लाभत  आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.