अथर्व इन्फर्टिलीटी सेंटरने पार केला १,००० टेस्ट ट्यूब बेबींचा आकडा पार

महाराष्ट्रात सर्वाधिक सरोगसी बाळांचा जन्म. सरोगेट  होस्टेल सुरु करणारे महाराष्ट्रातील पहिले आय.व्ही.एफ  सेंटर.६९२ जोडप्यांवर यशस्वी टेस्ट ट्यूब बेबी उपचार करून सिंगल ३८६ , ३०४ जुळे(६०८ बाळे)  व २ तिळ्यासह (६ बाळे) १,००० टेस्ट ट्यूब बेबींचा जन्म.  

नाशिकः अथर्व आयव्हीएफ सेंटर सध्या महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात कार्यरत आहे आणि गेल्या १० वर्षात सुमारे ५००० आयव्हीएफ सायकल पूर्ण केलेल्या आहेत.बदलती जीवनशैली, कामाचा ताण-तणाव, अल्कोहोल, तंबाखूचे सेवन आणि लठ्ठपणा यामुळे देशभरातील वंध्यत्वामध्य दिवसेंदिवस वाढ होताना आपल्याला दिसून येते. त्याशिवाय पॉली-सिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम, एंडोमेट्रियल क्षयरोग आणि लैंगिक संक्रमणामुळे देखील वंध्यत्वाला सामोरे जावे लागते. पूर्वी वंध्यत्वावर फार कमी उपचार पद्धती अस्तित्वात होत्या त्यामुळे स्त्रियांमधील वंध्यत्व दूर होणे अतिशय कठीण बाब होती त्यामुळे अनेक स्त्रीयांना मातृत्वाच्या सुखापासून वंचित राहावे लागत असे.  परंतु आता वंधत्व चिकित्सा व उपचार या क्षेत्रामध्ये खूपच क्रांतिकारकरित्या नवनवीन शोध लागले आहेत जेणेकरून अतिशय अवघड किंवा क्लिष्ठ कारणामुळे निर्माण झालेल्या वंधत्वावर मात करून अपत्यहीन जोडप्यांना आशेचा नवा किरण दिसू लागला आहे. 

नाशिक शहर हे महाराष्ट्र तसेच संपूर्ण भारतभरामध्ये आयव्हीएफच्या उपचारासाठी म्हणून उदयास येत आहे. अथर्व आयव्हीएफ सेंटर हे इन-विट्रो फर्टिलायझेशन (“आयव्हीएफ”) केंद्रातील भारतातील सर्वात मोठे नेटवर्क आहे. प्रगत आयव्हीएफ तंत्रज्ञानासह ते वंध्यत्वावर उपचार करतात. अथर्व आयव्हीएफ सेंटर सध्या महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात कार्यरत आहे आणि गेल्या १० वर्षात त्यांनी सुमारे ५००० आयव्हीएफ सायकल पूर्ण केलेल्या आहेत. अथर्व आयव्हीएफ मध्ये विशेष तज्ज्ञांसह ३५ कर्मचारी कार्यरत आहेत. अथर्व आयव्हीएफ रुग्णांना त्यांचे पालक होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उत्कृष्ट वैद्यकीय उपचार देण्यासाठी नेहमीच कार्यरत आहेत.  

याविषयी अधिक माहिती देताना अथर्व आयव्हीएफ सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक तसेच एंडोस्कोपी आणि वंध्यत्व विशेषज्ञ  डॉ. यशवंत माने म्हणाले की, “संशोधनानुसार असे आढळले आहे की नवनवीन तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे तसेच डॉक्टरांच्या अनुभवामुळे आयव्हीएफ यशस्वी होण्याचे प्रमाण वाढले आहे. वंध्यत्वावर आधुनिक उपचार, रुग्णांची आपुलकीने सेवा करणे यामुळे अथर्व आयव्हीएफ रुग्णांसाठी आशेचा किरण ठरला आहे. अथर्व आयव्हीएफ सेंटरने १,००० लाइव्ह टेस्ट-ट्यूब बाळांचा आकडा ओलांडला आहे. ते पुढे म्हणाले, “अथर्व आयव्हीएफ सेंटरमध्ये आम्ही नेहमीच रुग्णांना सर्वोत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करतो. तसेच आम्ही रुग्णाच्या सुरक्षिततेची पूर्णपणे काळजी घेतो. 

यावेळी बोलताना वंध्यत्व विशेषज्ञ आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. पल्लवी माने म्हणाल्या की, “विविध कारणांमुळे वंध्यत्वाच्या समस्येसाठी आयव्हीएफ हा एक उपाय आहे. भारतात, वंध्यत्व समस्यासाठी कायमस्वरुपी उपाय म्हणून आयव्हीएफकडे पहिले जाते. आयव्हीएफ मुळे रुग्ण हळूहळू जागरूक होऊन या प्रक्रियेची निवड करत आहे. 
त्या पुढे म्हणाल्या, “अनेकदा जोडप्यांना नैराश्याचा सामना करावा लागतो त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आणि त्यामुळेच वंध्यत्वासाराखी समस्या निर्माण होते. परंतु आयव्हीएफ उपचार हा अनेक जोडप्यांसाठी वरदान ठरलेला आहे.  
यावेळी बोलताना कन्सल्टेंट आणि स्त्रीरोगतज्ज्ञ अथर्व आयव्हीएफ सेंटर डॉ. प्रमोद पाटील म्हणाले की, आयव्हीएफ ही भारतातील प्रभावी उपचार पद्धती असून त्यामुळे अनेक जोडप्यांच्या आयुष्यात त्याचे सकारात्मक बदल झाले आहेत. 

अथर्व इन्फर्टिलीटी सेंटर विषयी थोडेसे:- अथर्व इन्फर्टीलीटी सेंटरची सुरुवात १४ मार्च २००८  साली नाशिक मध्ये प.पु.श्री.श्री.रविशंकर यांच्या हस्ते झाली. अल्पावधीतवच नाशिक व महाराष्ट्रामध्ये प्रसिद्धी मिळवली.नाशिकचे वंधत्व  विशेष तज्ञ डॉ यशवंत माने आणि प्रसूतीशास्त्र व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ पल्लवी माने संचलित अथर्व इन्फर्टिलीटी सेंटरने केवळ वंधत्वावर वेगवेगळ्या पद्धतीने उपचार करणारे महाराष्ट्रातील एक स्वयंपूर्ण आय .व्ही.एफ आधुनिक उपचार पद्धतीचे केंद्र आहे. अथर्व इन्फर्टीलीटी सेंटरमध्ये इंट्रा सायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शन(ICSI) एम्ब्रीयो क्रायोप्रिझर्वेशन, उसाईट डोनेशन, जेस्टेशनल सरोगसी.अल्ट्रासोनोग्राफी,आय.यु.आय(IUI),डोनर इनसेमिनेशन, सिमेन बँक इ सेवा पुरविल्या जातात.    

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.