जीवनात आदर्श व्यक्तीमत्वांचा आदर्श ठेवा – अभिनेते अशोक शिंदे

मुक्त विद्यापीठाचा केंद्रीय युवक महोत्सव; औरंगाबाद विभागाची बाजी
जीवनात आदर्श व्यक्तीमत्वांचा आदर्श ठेवा – अभिनेते अशोक शिंदे
नाशिक : प्रतिनिधी
 
जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर यश अपयश वाट्याला येते. कलाकाराबरोबरच उत्तम माणूस असणे महत्त्वाचे आहे. दैनंदिन जीवनात वावरताना विद्यार्थ्यांनी आपल्या डोळयासमोर विशिष्ट व्यक्तींचा आदर्श ठेवणे तितकेच आवश्यक बनले असून अशा आदर्श व्यक्तीमत्वांमुळेच आल्या जीवनाला नवी दिशा मिळते असे प्रतिपादन प्रसिद्ध चित्रपट अभिनेते अशोक शिंदे यांनी आज नाशिक येथे बोलताना व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने आयोजित युवक केंद्रीय महोत्सवाच्या उदघाटन अभिनेते शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, अभिनेते अशोक शिंदे, कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर आणि विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण व बहिशाल केंद्राच्या प्रमुख डॉ. विजया पाटील ह्या होत्या.
dsc_9311
फोटो ओळ : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाप्रसंगी बोलताना अभिनेते अशोक शिंदे. समवेत कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर आणि डॉ. विजया पाटील.
यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अशोक शिंदे म्हणाले, आपल्याकडे जे काही आहे त्यातुनच विश्व निर्मिती करायला हवी. जीवनात यशाची शिखरे पादाक्रांत करायची असल्यास योग्य संधी आणि योग्य वेळ मिळून यावी लागते हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे. चित्रपट सृष्टीतील स्ट्रगल, बदलती स्थित्यंतरे याविषयी मार्गदर्शन करतानाच वेगवेगळे अनुभव कथन करून आपला जीवनप्रवास विद्यार्थ्यांसमोर उलगडून सांगितला. कलाकार आणि खेळाडूंसाठी विविध संधी उपलब्ध असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना युवक महोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या. व मुक्त विद्यापीठ समाजातील विविध घटकांसाठी खुल्या केलेल्या शिक्षणाच्या संधींचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. कारण कलेबरोबरच आज शिक्षणही तेवढेच महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.
या केंद्रीय युवक महोत्सवात राज्यभरातून विविध विभागीय केंद्रातील ११४ स्पर्धकांनी २४ कला प्रकारांत सहभाग नोंदवला. या महोत्सवा अंतर्गत एकांकिका स्पर्धा, मुक अभिनय, विडंबन नाट्य्, गायन, वादन, चित्रकला, रांगोळी, फोटोग्राफी, वादविवाद, नृत्य, वकृत्व, रांगोळी आणि प्रश्नमंजुषा अशा विविध २४ प्रकाराच्या स्पर्धा यावेळी संपन्न झाल्या. त्याचा निकाल पुढीलप्रमाणे.
शास्रीय तालवाद्य- औदुंबर गाडगे, नाशिक विभागीय केंद्र, लोकसंगीत वाद्यवृंद – औरंगाबाद विभाग, भारतीय सुगम संगीत- अनुजा पत्की, औरंगाबाद विभाग, समूहगीत- भारतीय- कोल्हापूर विभाग, प्रश्न मंजुषा- निकिता पाटील, औरंगाबाद विभाग, वक्तृत्व – जितेंद्र पवार, औरंगाबाद विभाग, वादविवाद- निकिता पाटील, औरंगाबाद विभाग, छायाचित्र – गौरव मैंद, अमरावती विभाग, स्कीट- औरंगाबाद विभाग,  मूक अभिनय – अमरावती विभाग (प्रथम), मिमिक्री – सुलतान मिर्झा, अमरावती विभाग (प्रथम), काव्यवाचन – कोल्हापूर विभाग, एकांकिका – अमरावती विभाग (प्रथम), रांगोळी- शुभम पाटील, अमरावती विभाग (प्रथम),  पोस्टर – अभिजित गाडेकर, अमरावती विभाग (प्रथम), कोलाज – अभिजित गाडेकर, अमरावती विभाग (प्रथम), स्पॉट पेंटींग – ऋषिकेश लोखंडे, कोल्हापूर विभाग (प्रथम),  
 या स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून किरण लद्दे, आशिष रानडे, संगीता पेठकर, बाळ नगरकर, मिलिंद देशमुख आदींनी काम पाहिले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. मोहन खामगावकर आणि अभिनेते अशोक शिंदे यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली. प्रारंभी कुलसचिव डॉ. देनेश भोंडे यांनी स्वागत केले. डॉ. विजया पाटील यांनी प्रास्ताविक केले. जनसंपर्क विभागाचे प्रभारी प्रमुख संतोष साबळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रशांत कुलकर्णी तर आभार डॉ. विजया पाटील यांनी मानले.
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.