नाशिकचे वीरपुत्र जम्मू काश्मिर मध्ये शहीद,उत्तर महाराष्ट्रावर शोककळा

मुळचे नंदूरबार येथील रहिवासी असलेले आणि नाशिकमध्ये स्थायिक झालेले वीर जवान मिलिंद किशोर खैरनार हे दुरबार – जम्मू कश्मीर मधील बांदीकोरामध्ये सुरू असलेल्या चकमकीत शहीद झाले आहेत. यामध्ये त्यांनी  भारतीय सुरक्षा दलाच्या जवानां सोबत मोठा लढा देत अनके दहशतवाद्यांना यमलोकी पाठवले आहे.

वीरपुत्र शहीद मिलिंद  खैरनार आणि त्यांचा परिवार

हाजीन भागात पहाटे सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये संघर्ष उडाला होता. त्यामुळे पुन्हा तणावाचे वातावरण तयार झाले होते. यामध्ये काही दहशतवादी हे लष्कराच्या गोळीबारानंतर दहशतवादी एका घरात लपून बसले होते. तेव्हा या लपलेल्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरु केले होते.

यावेळी घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार  केला होता. त्यावर प्रतिउत्तर देत आपल्या जवानांनी जबरदस्त उत्तर दिले होते. त्यात दोन्ही दहशतवादी ठार झाले. परंतु या संघर्षात भारतीय लष्कराचे दोन जवान शहिद झाले. या शहिदांमध्ये मिलिंद किशोर खैरनार यांचा समावेश आहे.

याच ठिकाणी चकमक झाली होती.

मिलिंद खैरनार यांच्याबद्दल

वीरपुत्र मिलिंद खैरनार हे बोराळे ता. जि. नंदुरबार येथील मुळ रहिवासी आहेत. त्यांचे बाबा किशोर खैरनार धुळे जिल्ह्यातील साक्री या ठिकाणी वीज महामंडळाच्या कार्यालयात नोकरीस होते. त्यामुळे मिलिंद यांचे संपूर्ण बालपण हे साक्री येथे गेले. वीरपुत्र जवान मिलिंद खैरनार आपल्या मामांकडे शिक्षणासाठी होते. ए.एस.व्ही.पी.एस. महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण करत ते भारतीय लष्करात भरती झाले होते. सार्जंट मिलींद खैरनार एअर फोर्सच्या गरुड फोर्स मध्ये कार्यरत होते त्यांच्या मागे  आई वडील, पत्नी, दोन मुलं असा परिवार आहे. सव्वीस अकरा ला मुंबई ताज हॉटेलवर झालेल्या हल्ल्यात आतंकवादीचा खात्मा करण्यात शहीद मिलिंद खैरनार यांचा मोठा सहभाग होता.

मिलिंद यांचं पार्थिव उद्या सकाळी ओझरच्या विमानतळावर आणण्यात येणार आहे. त्यानंतर नंदुरबार येथील रनाळे येथील मूळगावी त्यांच्यावर अंतसंस्कार केले जाणार आहे

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.