पोलिस आयुक्तालय परिसरात, जिल्हा परिसरात शस्त्रबंदी,जमावबंदी आदेश जारी

नाशिक : शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी शहर पोलिस उप आयुक्त विशेष शाखा विजयकुमार मगर यांनी  29 जुलै  2018 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत  मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे 36 अन्वये शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी यांना नाशिक पोलीस आयुक्तालय परिसरात लेखी  व तोंडी आदेश देण्याचे अधिकार प्रदान केले आहेत.

या कालावधीत आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी रस्त्यावरील जाणाऱ्या मिरवणुकीतील व्यक्तींचे वागणे, बिभत्स व अश्लिल हावभाव अथवा कृत्याबाबत आदेश देणे, ज्यामार्गाने मिरवणुक किंवा जमाव जाईल अथवा जाणार नाही ती वेळ निश्चित करणे, सार्वजनिक ठिकाणी अगर सार्वजनिक कार्यक्रमांच्या वेळी वापरावयाच्या लाऊड स्पिकरची वेळ, पद्धती, ध्वनीची तिव्रता, आवाजाची दिशा नियंत्रण करणे, रस्त्यावर, सार्वजनिक जागेवर गाणी, संगीत ड्रम्स, ताशे, ढोल किंवा इतर वाद्ये, हॉर्न वाजवणे किंवा कर्कश आवाज करण्यावर नियंत्रण ठेवणेसाठी हे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. आदेशाचा भंग करणारी व्यक्ती मुंबई पोलीस कायदा 1951 च्या कलम 134 नुसार शिक्षेस पात्र राहील.

पोलिस आयुक्तालय परिसरात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश

शहर पोलीस आयुक्तालय परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी  29 जुलै 2018  रोजी रात्री 12 वाजेपर्यंत  मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे 37 (1) (3) अन्वये शस्त्र  व जमावबंदी आदेश जारी करण्यात आला आहे. आदेशाचा भंग करणारी व्यक्ती मुंबई पोलीस कायद्याच्या कलम 135 नुसार शिक्षेस पात्र राहील, असे पोलिस विशेष शाखेचे उप आयुक्त विजयकुमार मगर यांनी  कळविले आहे.

नाशिक जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश

जिल्ह्यात (पोलीस आयुक्त नाशिक शहर यांची हद्द वगळून) कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी  अपर जिल्हादंडाधिकारी रामदास खेडकर यांनी  28 जुलै 2018 पर्यंत मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे 37 (1) (3) अन्वये शस्त्र  व जमावबंदी आदेश जारी केला आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.