अपंग प्रशिक्षण केंद्रात मोफत प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

अपंग प्रशिक्षण केंद्रात मोफत प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नाशिक  अपंग कल्याण आयुक्तालय मार्फत तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र ,देगलूर या संस्थेत अपंग व मुकबधीर विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण, वेल्डर, आणि सीट मेटल, शिवण व कर्तन कला, सी.एन.सौंदर्यशास्त्र, सी.सी.ईन. वायरमन आणि प्लंबर इत्यादी अभ्यास क्रमांसाठी 15 ते 35 वयोगटातील विद्यार्थ्यांना 30 जून पर्यंत  प्रवेश देण्यात येणार आहे, तसेच यशवंतराव मुक्त विद्यापीठ अंतर्गत पदवी शिक्षणाची सोय करण्यात आलेली आहे. प्रवेशित विद्यार्थ्यांना प्रतिमाह विद्यावेतन देण्यात येणार असून त्यांच्या निवासी, वैद्यकीय, औषधोपचार, प्रशिक्षणाची सोय विनामुल्य करण्यात येणार आहे. तरी इच्छुक अपंग मुला- मुलींनी, पालकांनी प्राचार्य, तुळजा भवनी अपंग प्रशिक्षण केंद्र, शिवनेरी नगर, रामपूर रोड, देगलूर जि. नांदेड मो. 9960900369, 9175446411, 7276320578 येथे संपर्क करावा.                                             

अपंगांसाठी मोफत संगणकीय व्यावसाईक प्रशिक्षण

नाशिक  अपंग कल्याण आयुक्तालय , शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह या संस्थेअंतर्गत सर्टिफिकेट इन कॉम्पुटर ऑपरेशन वुईथ एम.एस. ऑफिस  व मोटार ॲण्ड आमेंचर रिवायडींग सबमर्सिबल पंप सिंगल फेज, एम.एस.सी.आय.टी. (संगणक कोर्स ) या एक वर्षीय प्रशिक्षणासाठी सन 2017-18 साठी मोफत प्रवेश देणे सुरू आहे. प्रवेशासाठी शैक्षणिक पात्रता अनुक्रमे किमान 8 वी व 9वी पास असून वयोमर्यादा 16 ते 40 वर्ष अशी आहे. प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी 31 जुलै 2017 पर्यंत अधीक्षक, शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, टाकळी रोड, म्हेत्रे मळा गोदड मळ्याजवळ, मिरज जि.सांगली पिन कोड 416410 नंबर 0233-2222908  व मोबाईल क्रमांक 9922577561, 9975375557 वर संपर्क करावा. प्रवेश अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, अपंगत्व असल्याचे सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र व उत्पन्नाचा दाखला यांच्या झेरॉक्स प्रती जोडाव्यात.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.