रासायनिक खते खरेदी करताना काळजी घेण्याचे आवाहन

नाशिक : राज्यात शेतकऱ्यांनी खरिप हंगामात पीक लागवडीस सुरुवात झाली असून  भेसळ असलेल्या खतांची खरेदी न करता अधिकृत परवानाधारक विक्री केंद्रातून तसेच केंद्र व राज्य शासनाने मंजूर केलेल्या गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत ग्रेडच्या खत खरेदीस प्राधान्य देण्याचे आवाहन कृषी  विभागातर्फे करण्यात आले आहे.

राज्यात कृषी निविष्ठा गुणवत्ता नियंत्रणासाठी स्वतंत्र कक्ष कार्यान्वित असून  1131 निरक्षकांची नेमणुक करण्यात आली आहे.    राज्यात काही ठिकाणी खत नियंत्रण आदेशातील समाविष्ठ ऑर्गेनिक डी.ए.पी किंवा नॅचरल पोटॅश अशा बनावट खताच्या बॅगवर चुकीचा मजकूर छापून विक्री करीत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी फसवणूक टाळण्यासाठी विनापरवाना विक्री होत असलेल्या ठिकाणाहून  तसेच अनधिकृत विक्रेते यांच्याकडून खत खरेदी करु नये. बॅगवरील मजकूर योग्य असल्याची खात्री करुन खत खरेदी करावे.

दिशाभुल करुन खतांची विक्री होत असल्यास किंवा चुकीच्या पद्धतीने खत विक्री ही खत नियंत्रण आदेश 1985 या कायद्यान्वये दंडनीय अपराध आहे. तसे आढळून आल्यास जवळ असलेल्या पंचायत समिती, कृषि विभाग व तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे कृषी विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.