बागलाण तालुका दुष्काळी जाहीर करा – श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेची मागणी

सटाणा : बागलाण तालुका दुष्काळी जाहीर करण्यात यावा या मागणीचे निवेदन बागलाण चे तहसीलदार मा.प्रमोद हिले यांना बागलाण तालुका श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या वतीने देण्यात आले. announce baglan tehsil drought affected rajput karni sena satana

बागलाण तालुक्यात या वर्षी पाऊसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे कोरडवाहू क्षेत्रातील पिके धोक्यात आले असून,या पिंकाचे उत्पादन हातातून गेले आहे.जुलैच्या महिन्यात थोड्याफार प्रमाणात झालेल्या पावसावर पेरणी केली मात्र मागील एक महिन्यापासून ढगाळ वातावरणाशिवाय पावसाच्या सरी पडल्या नाहीत.त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रातील पिके कोमजली असून बागायती क्षेत्रातील पिके कसदार जमिनिअभावी कशी बशी तग धरून उभी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप पिंकाची उत्पन्नाची शाश्वती नाही.

पंधरा दिवसांत पाऊस न आल्यास पुढील रब्बी हंगाम ही धोक्यात येणार असल्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहे. यामुळे तालुक्यातील सर्व गावांची आणेवारी ५० पैश्याच्या आत करावी. बागलाण तालुक्याला दुष्काळी सेवा सुविधांचा लाभ मिळावा तसेच सर्व राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्जवसुली थांबवावी व शेतकऱ्यांना पुरेसा कर्जपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी ही निवेदनाद्वारे करण्यात आली. announce baglan tehsil drought affected rajput karni sena satana

यावेळी प्रदेश प्रभारी सुभाष ठोके, प्रदेश उपाध्यक्षसंदीप पवार, प्रदेश महासचिव छोटू जगताप, प्रदेश युवा प्रवक्ता राजेंद्र सावकार, तालुकाध्यक्ष कल्याणसिंग वाघ, जिल्हा उपाध्यक्ष नंदू तात्या पवार, प्रदेश संपर्क प्रमुख दिपक ठोके, प्रदेश महामंत्री दत्तू पवार, शहराध्यक्ष अशोक पवार, तालुका उपाध्यक्ष सोनू बागुल, विभागीय प्रसिद्धी प्रमुख चैतन्य ठोके, नाशिक जिल्हा प्रसिद्धी प्रमूख सागर ठोके, युवा तालुकाध्यक्ष सुरज जाधव, युवा उपाध्यक्ष सोनू पवार, अतुल जाधव, राहुल ठोके, विशाल ठोके, राणा पवार, पोपट जगताप, आशुतोष शिरसाठ, राहुल खरे, आदी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

announce baglan tehsil drought affected rajput karni sena satana
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.