Ankur Film Festival डिसेंबर ६ ते ८ मध्ये आयोजन

यंदाही दिग्गज मान्यवरांच्या भेटीसोबतच माहितीपूर्ण कार्यशाळांचे आयोजन प्रथमच विदेशातून आलेल्या फिल्मचे सादरीकरण Ankur Film Festival  

दरवर्षीप्रमाणे यंदाही अभिव्यक्ती, मीडिया फॉर डेव्हलपमेंट, नाशिक यांच्या कडून   आठव्या अंकुर फिल्म फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टीव्हलच्या आयोजनाची तयारी अंतिम टप्प्यात झाली असून येत्या ६ ते ८ डिसेंबर या कालावधीत कुसुमाग्रज स्मारकात फेस्टीव्हल संपन्न होणार आहे.

यंदाही नाशिककरांना चित्रपटांची मोठी मेजवानी मिळणार असून सोबत कार्यशाळा आणि मान्यवरांशी संवाद साधता येणार आहे. विशेष म्हणजे यंदा पहिल्यांदाच विदेशातूनही सादरीकरणासाठी फिल्मस आल्या असून त्या सुद्धा दाखविल्या जाणार आहेत.

अंकुर फेस्टिव्हलच्या माध्यमातून नेहमीच नवोदितांना आपली सृजनशीलता, कल्पकता लोकांसमोर मांडण्याचे हक्काचे व्यासपीठ मिळत आले आहे. सोबतच समाजातील अनेक समस्या, प्रश्न, बदल यावर दृक्श्राव्य माध्यमातून फेस्टीव्हलमध्ये चर्चा घडवून आणली जाते. अनेकजण आपली मते रोखठोकपणे मांडून समाजाशी थेट संवाद साधतात.

हीच परंपरा पुढे नेत यंदाही सुमारे १०० फिल्मस् दाखवल्या जाणार आहेत. यात माहितीपट, कम्युनिटी व्हिडीओ, अॅनिमेशनपट, शार्ट फिल्म यांचा समावेश आहे.

या फेस्टीव्हला कायमच दानशूर संस्था आणि व्यक्तींनी मोलाची मदत करत आलेले आहेत. यंदाही सामाजिक दायित्वाच्या अंतर्गत इच्छूकांनी आर्थिक आणि त्यासोबतच भेटवस्तू, प्रवास, भोजन, निवास, सजावट, आदीसाठी मदत करावी असे आवाहन अभिव्यक्तीकडून करण्यात आले आहे. यासाठी ९७६४३५७४४९, ०२५३ -२३४६१२८  संपर्क करता येईल.Ankur Film Festival

चुकवू नये असे चित्र प्रदर्शन
https://www.facebook.com/NashikOnWeb/
आमचे फेसबुक पेज लाईक करा,
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.