कर्मचाऱ्यांकडून मॅनेजरला जबर मारहाण, सीसीटीव्हीत घटना कैद  

नाशिक : नाशिक शहरात असलेल्या सातपूर या औद्योगिक वसाहतीमधील डायनॅमिक कंपनीतील कर्मचाऱ्यांनी मॅनेजरला जबर मारहाण केली आहे. सदरची मारहाण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांना नोटीस पाठविली होती. या रागातून मॅनेजरला मारहाण झाली आहे.angry worker beat manager dynamic company nashik 

सातपूर औद्योगिक वसाहतीतील प्लॉट क्र.१२६ मध्ये डायनॅमिक प्रा.लि. आहे. या कंपनीतील कामगार सुरेश चव्हाण याला व्यवस्थापनाने नोटीस बजावली. या नोटीसीचा राग आल्याने चव्हाण याने कंपनीतील अधिकारी सचिन भीमराव दळवी याला लोखंडी रॉडने मारहाण केली. मंगळवारी दुपारी मारहाणीचा हा प्रकार घडला. यात सचिन दळवी गंभीर जखमी झाले असून  त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याप्रकरणी दळवी यांनी रात्री उशिरा सातपूर  सातपूर पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी चव्हाण आणि आनंद सिंग या दोघा कामगारांना ताब्यात घेऊन भादवी 323,324,506,34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे या कंपनीत सदर मनसेचे  माजी महापौर अशोक मुर्तडक यांची महाराष्ट्र औद्योगिक कामगार सेना युनियन कार्यरत आहे.

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा ! Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.