आनंद ऋषीजी महाराज यांचा जन्मदिवस – विशेष लेख

राकेश बोरा,लासलगाव

जैन धर्मियांचे आचार्य श्री आनंदऋषीजी महाराजांचा जन्म श्रावण शुक्ल प्रतिपद २७ जुलै १९०० साली आपल्या महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यामधील चिचोंडी या गावी झाला. त्यांचे नाव नेमीचंद होते. त्यांच्या वडिलांचे नाव देवीचंदजी गुगळे आणि आईचे नाव हुलसाबाई. मोठ्या भावाचे नाव उत्तमचंदजी होते. आनंदऋषीजी लहानपणासुनच धार्मिक होते, त्यांचे गुरू रत्न ऋषीजी महाराज यांच्या कडून त्यांना लहानपनापासुन आध्यात्मिक मार्गदर्शन मिळाले. Anand Rhushiji Maharaj Jain Acharya Birthday Sprcial Article Rakesh Bora

Anand Rhushiji Maharaj Jain Acharya Birthday Sprcial Article Rakesh Bora

आनंदऋषीजीनी वयाच्या १३व्या वर्षी त्यांचे संपूर्ण आयुष्य जैन संत म्हणून व्यथित करण्याचे ठरविले. त्यांनी ७ डिसेंबर १९१३ साली(मार्गशीस शुक्ल नवमी) अहमदनगर जिल्हातील मिरी या गावी दिक्षा घेतली, त्यावेळी त्यांना आनंदऋषीजी महाराज हे नाव देण्यात आले.आनंदऋषीजी यांनी पंडित राजधरी त्रिपाठी यांच्याकडून संस्कृत आणि प्राकृत शिक्षणास सुरुवात केली. त्यांनी १९२० साली अहमदनगर येथे पहिले प्रवचन दिले.

आनंदऋषीजीनी पुढे रत्नऋषीजी सोबत जैन धर्माच्या प्रसार व प्रसाराचे कार्य संपूर्ण भारत भर केले. चातुर्मासात संत गृहस्ताच्या विंनतीवरुन एका ठिकाणी वास्तव्य करु शकतात. Anand Rhushiji Maharaj Jain Acharya Birthday Sprcial Article Rakesh Bora

ऋषीजी महाराज यांच्या १९२७ साली अलीपुर येथील (संथारा) मॄत्युनंतर आनंदऋषीजीनी त्यांच्या गुरुशिवाय हिंगणघाट येथे पहिला चार्तमास केला. १९३१ साली आनंदऋषीजी यांच्या बरोबर झालेल्या धार्मिक चर्चेनंतर जैन धर्म दिवाकर महाराज यांना आनंदऋषीजीची आचार्य होण्याची क्षमता जाणवली.

आचार्य आनंदऋषीजींनी २५ नोव्हेबर १९३६ साली श्री. तिलोक रत्न स्थानकवासी जैन धार्मिक परिक्षा बोर्डची स्थापना केली.

१९५२ साली राजस्थान मध्ये सादडी येथे झालेल्या साधु संमेलन मध्ये त्यांना जैन श्रीमान संघाचा प्रधान म्हणुन घोषीत करण्यात आले. १३ मे १९६४ साली (फाल्गुन शुक्ल एकादशी) आनंदऋषीजी श्रमण संघाचे दुसरे आचार्य झाले,याचा समारोह राजस्थान येथील अजमेर येथे झाला. Anand Rhushiji Maharaj Jain Acharya Birthday Sprcial Article Rakesh Bora

आनंदऋषीजी १९७४ साली त्यांचा मुंबई येथील चार्तमास पुर्ण करुन पुण्याला आले. पुण्यात शनिवार वाडा येथे त्यांचे भव्य स्वागत समारंभ करण्यात आला. १३ फेब्रुवारी १९७५ साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव नाईक यांनी त्यांना राष्ट्र संत म्हणुन गैरविले. त्याच वर्षी आनंद फाऊंनडेशनची स्थापना झाली हे त्यांचे ७५व्या वाढदिवसाचे वर्ष होते.

आनंदऋषीजींनी २८ मार्च १९९२ साली अहमदनगर येथे त्यांचा मॄत्यु झाला. अहमदनगर येथील आनंदऋषीजी हॉस्पिट्ल हे त्यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आहे.

यानिमित्ताने लासलगाव येथील जैन स्थानकात आनंद सौभाग्य सप्ताह कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याची सांगता आज येथील संघात मोठ्या उत्साहात पार पडली.यावेळी प.पु.प्रकाशमुनीजी, प.पु.दर्शनमुनीजी म.सा.यांनी प्रवचन दिले.

Anand Rhushiji Maharaj Jain Acharya Birthday Sprcial Article Rakesh Bora
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.