व्हॅलेंटाईन डे दिवशी बच्चू कडू यांचा  दिव्यांगासाठी प्रहार मोर्चा  

नाशिक : प्रसिद्धीपत्रक amdar bacchu kadu divyang morcha disabled people nashik

दिव्यांग व्यक्तींना सर्वच शासकीय ठिकाणी योजनांचा लाभ घेण्यासाठी येत असलेल्या अडचणी व अपमानास्पद मिळणारी वागणूक,  या सर्व समस्यांचे मुळ कारण सरकार व सरकारी यंत्रणेतील काही भ्रष्टाचारी, बेजबाबदार अधिकारी, कर्मचारी, बेजबाबदार सरकार यंत्रणेला धडा शिकवण्यासाठी लोकशाही मार्गाने , दिव्यांग व्यक्तींच्या एकजुटीने ,  आक्रमक होत या झोपलेल्या सरकारी यंत्रणेला जागे करण्यसाठी, अधिकारी कर्मचारी यांना त्यांच्या कर्तव्याची, जबाबदारीची जाणिव करुन देण्यासाठी व्हॅलेंटाईन डे 14 फेब्रुवारी  2018  रोजी  दिव्यांगासाठी प्रहार मोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे.amdar bacchu kadu divyang morcha disabled people nashik.

आमदार बच्चू कडु यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रहार अपंग क्रांती आंदोलन नाशिक जिल्हाध्यक्ष सचिन भाऊ पानमंद यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय वर हा मोर्चा काढण्यात येणार आहे.दिव्यांग नोंदणी,  व अंध अपंगांचा राखीव तिन टक्के निधी खर्च न करणार्‍या ग्रामसेवक यांच्या वर कारवाई करणे,  संजय गांधी निराधार योजनेचे अनुदानात वाढ करणे,  अंध अपंगांना विनाअट घरकुल मंजूर करणे,  रोजगारासाठी कर्ज मंजूर करणे या सर्व इतर मागण्या मान्य करण्यासाठी नाशिक जिल्हय़ातील सर्व दिव्यांग बांधवांना एकजुट दाखवण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

सर्व दिव्यांग बंधु भगिनींना विनम्र आवाहन करण्यात येते की आपण मोठ्या संख्येने अगदी न विसरता दिनांक 14 फेब्रुवारी रोजी विराट दिव्यांग मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

एक दिव्यांग !  लाख दिव्यांग  !

चला लढु या.  दिव्यांगांच्या न्याय हक्कासाठी  !

मोर्चा चे ठिकाण : मनसे कार्यालयाशेजारी,  ठक्कर बाजार, नवीन सी बी एस, नाशिक

वेळ : सकाळी अकरा वाजता

आमचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/NashikOnWeb/

 

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.