market committees राज्यातील सर्व बाजार समित्या उद्या बंद राहणार

नाशिक : प्रतिनिधी  केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात ८ तारखेला राज्यातील सर्व बाजार समित्या बंद राहणार आहेत.  याबाबतची माहिती मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक जयदत्त होळकर यांनी दिली. केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याने देशभरातील शेतकरी त्रस्त झाले असून केवळ उद्योगपती धार्जीणे धोरण राबवत आहे.
केंद्र सरकारने शेतकरी वर्गाला या मोठ्या उद्योगपतीच्या तालावर नाचविण्यासाठीच हे कायदे आणले असून देशभरातील शेतकरी संतप्त झाला आहे, अशी माहीती होळकर यांनी दिली.  त्यामुळेच केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात ८ डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद राहणार असल्याची माहितीही जयदत्त होळकर यांनी दिली.market committees
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.