संघटित विरोध करण्याचा राज ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला, लवकरच भूमिका स्पष्ट करणार

समृद्धी बाधित शेतकऱ्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

नाशिक : आज (दि. १०) समृद्धी बाधित शेतकऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. सर्व मुद्दे मांडताना अकडेवारीसह शेतकऱ्यांनी परिस्थिती समजून सांगितली असता राज यांनी केवळ समृद्धी बाधित शेतकऱ्यांनी विरोधात रस्त्यावर न उतरता सर्व शेतकऱ्यांनी एकत्रितपणे विरोध करण्याची गरज असल्याचे स्पष्ट करत इतर शेतकऱ्यांशी बोलून एकी दाखवल्याशिवाय सरकार जुमाणणार नसल्याचे म्हटले आहे. राज ठाकरे महानगर पालिका निवडणुकांनंतर तब्बल नऊ महिन्यांनी तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आले आहेत.

samruddhi badhit shetkari meet raj thackeray nashik

संपूर्ण १० जिल्ह्यातील शतकर्यांनी एकत्र येऊन विरोध करण्याचा सल्ला राज यांनी दिला असला तरी समृध्दी महामार्गाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली नाही. या गोष्टीचा अभ्यास करून आपण भूमिका मांडणार असल्याचे राज म्हणाले.

या चर्चेदरम्यान राज यांनी आपल्या लोकप्रतिनिधींपुढे तक्रारी करून त्यांना सोबत घेत आंदोलने पुढे रेटण्याचेही सांगितले. सत्तेमध्ये असलेले लोकप्रतिनिधी सोबत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितल्यानंतर शेतकऱ्यांनी एकत्र येऊनच लढण्याची तयारी करण्यास सांगितले.

राज यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचे समृद्धी बाधित शेतकऱ्यांचे नेते राजू देसले यांनी सांगितले. राज यांनी पुढील काळात समृध्दीबाबत लवकरच भूमिका स्पष्ट करतील अशी आशा बोलून दाखवली.

samruddhi badhit shetkari meet raj thackeray nashik

राज ठाकरे यांच्यासारख्या नेत्याने आम्हाला तासाभराचा वेळ देत अतिशय शांतपणे आमचे म्हणणे ऐकून घेतले हीच आमच्यासाठी महत्वाची गोष्ट आहे. अशा नेत्याने आमच्या शेतकऱ्यांचे ऐकून घेऊन आपली भूमिका स्पष्ट केल्यास आमच्या लढ्याला आणखी ताकद मिळेल व लवकरच हा मार्ग रद्द होईल अशी आशा शिवडे गावचे रावसाहेब हरक यांनी म्हटले आहे.

या चर्चेनंतर शेतकरी एकत्र आले असते आणि प्रश्न सुटले असते तर अनेकदा क्रांती घडल्या असत्या अशी कुजबुज काही शेतकऱ्यांमध्ये झाली असून तरीही आमचे लढ्याचे प्रयत्न सुरूच राहणार असून राज यांनी लवकरच भूमिका स्पष्ट करावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

एकूणच ही चर्चा सकारात्मक झाली असून मुख्यमंत्री फडणवीस आणि गडकरींचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी बाबतच्या राज ठाकरे यांच्या भूमिकेवर सर्वांचेच लक्ष असणार आहे हे नक्की.

– आकडेवारीसह शेतकऱ्यांनी मंडळी आपली व्यथा
– सरकारचा व प्रशासनाचा जाचाचा वाचला पाढा
– आपल्या आमदार व खासदारांकडे जाऊन त्यांना विरोध करण्यास सांगावे – राज ठाकरे
– शेतकऱ्यांनी एकत्र येऊन विरोध करण्याचा राज ठाकरेंचा सल्ला
– सकारात्मक चर्चेवर शेतकरी समाधानी, राज ठाकरेंनी लवकर भूमिका मांडावी
– शेतकरी एकत्र आले असते आणि प्रश्न सुटले असते तर अनेकदा क्रांती घडल्या असत्या. शेतकाऱ्यांमधील कुजबुज
– फडणवीस आणि गडकरींचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी बाबतच्या राज ठाकरे यांच्या भूमिकेवर सर्वांचेच लक्ष

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.