अक्कलकुवा ते नाशिक बि-हाड मोर्चा स्थगित

नाशिक : आदिवासी विभागाच्या शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांच्या मागण्यांबाबत काढण्यात आलेल्या बिऱ्हाड मोर्चा स्थगित करण्यात आला आहे. 

गुरूवारी मंत्रालयात झालेल्या मुख्य सचिवांच्या बैठकीत आदिवासी विकास विभागाच्या कर्मचा-यांच्या मागण्यांबाबत येत्या तीन महिन्यात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आता अक्कलकुवा ते नाशिक दरम्यान आदिवासी कर्मचा-यांनी काढलेला बि-हाड मोर्चा स्थगित करण्यात आल्याची घोषणा केली आहे.

आदिवासी विकास आयुक्तालयावर शनिवारी हा मोर्चा धडकणार होता. मात्र येण्यापूर्वी सोग्रस फाट्यावरून मोर्चेकरी मिळेल त्या वाहनाने शुक्रवारी परतीच्या मार्गाला लागले आहेत.

राज्याचे  मुख्य सचिव सुमित मल्लिक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे.

त्यामुळे महाराष्ट्र रोजंदारी कर्मचारी संघटनेने आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली संघटनेने केली आहे.

Akkalkuwa Nashik Birhad Morcha suspended tribal development department employees
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.