२५ मे पासून विमान वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरू होणार,

नवी दिल्ली: देशभरातील विमानसेवा २५ मेपासून सुरू केली जाणार आहे. नागरी उड्डाण मंत्री हरदीप पुरी यांनी ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्यात आली होती. मात्र आता सरकारनं देशांतर्गत हवाई वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून देशांतर्गत हवाई वाहतूक सुरू होणार असल्याची माहिती नागरी उड्डाण मंत्री यांनी ट्विटरवर दिली. याबद्दल सर्व विमानतळांना सूचना दिल्या जात आहेत.

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोरोना पॉझिटिव्हचे ५६११ नवीन रुग्ण आढळले आहेत आणि १४० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशभरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढून १,०६,७५० झाली आहे. तर आतापर्यंत ३,३०३ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. देशात सद्या ६१,१४९ रुग्ण कार्यरत आहेत तर ४२,२९८ लोक कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले असून आतापर्यंत ३,३०३ लोकांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ३९. ६२ टक्क्यांवर गेला आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.