सुकाणू समिती तर्फे आज नाशिक सह जिह्यात जोरदार निदर्शने करण्यात आली

प्रतिनिधी : राम खुर्दळ 

शेतकरी विविध संघटना त्यांची सुकाणू समिती तर्फे आज नाशिक सह जिह्यात जोरदार निदर्शने करण्यात आली आहे. यामध्ये कोणताही अनुचित प्रकार सुकाणू समितीने घडू दिला नाही. मात्र सरकार विरोधात जोरदार घोषणा देत आणि महामार्ग तसेच अनेक ठिकाणी गाव बंद करत, बाजारसमितीचे व्यवहार बंद केले गेले आहे.

सुकाणू समितीने आज राज्य चक्क बंद आंदोलन हाक दिली होती. सुकाणू समितीचे गड असलेल्या नाशिकमध्ये समिती तर्फे जोरदार निदर्शने करण्यात आली आहे. यामध्ये मालेगाव, दिंडोरी, निफाड, मनमाड, नाशिक, त्र्यंबकेश्वर आदी ठिकाणी जोरदार आंदोलने केली गेली आहेत. पोलिसांनी जवळपास १०० आंदोलक तर ताब्यात घेतली आहे. हे आंदोलन करत असतांना सरकारचा निषेध करून विजबिलाची अनेक ठिकाणी होळी केली आहे. बीजेपी सरकारने शेतकऱ्यांच्या केलेल्या फसवणुकीच्या निषेर्धात नाशिक जिल्ह्यातील चांदोरी येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

प्रमुख मागण्या :

  • शेतकऱ्यांचे आज पर्यतचे सर्व प्रकारचे नियमित व थकित सर्व कर्ज माफ करा*
  • शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव द्या
  • स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशिची आमल बजावनी करा
  • शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करुण कायम स्वरूपी मोफत वीज द्या
  • शेतकऱ्यांना वयाच्या ६० वर्षानंतर किमान ३००० रुपये पेंशन लागु करा

घोटी टोल नाक्यावर सुकाणू किसान समिती,सर्व संघटनेच्या,काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे,भाकप माकप,संघटना शेतकरी ,महिला आदी नि रास्तारोको आंदोलन केले. सम्पूर्ण कर्ज माफी करा.समृद्धी मार्ग रद्द करा. वीज बिल माफ करा. स्थानिक युवकांना रोजगार दया मागण्या साठी रास्तारोको करण्यात आले

यामध्ये १५ ऑगस्ट रोजी पालकमंत्री असतील त्या ठिकाणी त्यांना ध्वजारोहण केले जावू देणार नाही असा पवित्रा देखील आंदोलकांनी घेतला आहे.

गिरणारे ता.नाशिक येथील चौफुलीवर शेतकऱ्यांनी चक्का जाम आंदोलन केले.रस्त्यावर ठिय्या आंदोलन करून बैलगाडीसह शेती औजारे,या आंदोलनात ठेवण्यात आली होती,या वेळी शेतकरी आंदोलकांनी विजवितरण ने लादलेल्या हजारो रुपयांच्या विजबिलांची होळी केली आहे. विशेषता रस्ता रोको सुरू असतांना आंदोलक शेतकऱ्यांनी एसटी महामंडळाच्या वाहक व चालकाचा श्रीफळ देऊन सत्कार केला आहे.  कर्जमाफीच्या फसव्या योजनेच्या प्रकाराबद्दल सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या आहेत.

या रस्ता रोको आंदोलनात सरकार विरोधी घोषणां देत हरसूल,ठाणापाडा गुजरात सीमेकडून कडून येणारा मार्ग गिरणारे चौफुलीवर रोखून धरला,या शेतकरी आंदोलकांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे असलेले निवेदन मंडल अधिकारी प्रफुल्ल कोटगीरे,तलाठी एस.पी.गांगुर्डे, पोलीस उपनिरीक्षक एस.डी. परदेशी,पोलीस कॉन्स्टेबल रोहन घायतड यांना देण्यात आले.या शेतकरी चक्का जाम आंदोलनात शेतकरी संघटनांचे समन्वय अनिल थेटे, शेतकरी वाचवा अभियानाचे राम खुर्दळ,लहाणू पाटील थेटे,दिनकर थेटे,निवृत्ती घुले,नामदेव गायकर,सोपान थेटे,राम थेटे,महेंद्र थेटे,अरुण घुले,निवृत्ती कसबे,संतोष थेटे,बबन थेटे, भारत ढिकले,योगेश पाटील,महेंद्र कातडं,ज्ञानेश्वर गायकर,दीपक थेटे,अमोल मोरे,दिलीप हंडोरे,बाळासाहेब थेटे,अरुण थेटे,माणिक थेटे,सुरेश थेटे,उत्तम उगले,अविनाश कसबे,संदीप शिंदे,तुकाराम कसबे यासह परिसरातील शेतकरी,धरणग्रस्त,आळंदी उपसातील कर्जबाजारी शेतकरी,स्थानिक नागरिकांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.