जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आंदोलनास बंदी

  त्र्यंबक नाका ते अशोक स्तंभ या दरम्यानच्या जुना आग्रा महामार्गावर स्मार्ट सिटी प्रकल्पातंर्गत रस्त्याचे काम सुरू करण्यात आल्याने  जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जवळील अन्य शासकीय कार्यालयाजवळ (आदिवासी विकास महामंडळ, जिल्हा परिषद आदी) विविध कारणांसाठी  संघटना ,राजकीय पक्ष यांचेवतीने मोर्चे , निदर्शने, उपोषण, रॅली मिरवणूक, सभा, मेळावे व अन्य प्रकारची  आंदोलनांना  पोलीस उपायुक्त परीमंडळ-1 अमोल तांबे यांनी  30 नोव्हेंबर 2019 पर्यंत मुंबई फौजदारी प्रक्रिया संहिता  1973 (1974 चा 2 रा) च्या कलम 144  (1) (2) नुसार परवानगी नाकारली आहे.

     रस्त्याचे काम दीर्घ कालावधीसाठी चालणार असून जाणारी येणारी वाहतुक रस्त्याच्या एका बाजूस वळविण्यात आली आहे. कुठल्याही प्रकारचे आंदोलन झाल्यास वाहतूक कोंडी होवून कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी ही परवानगी नाकारण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणारे कायदेशीर कारवाईस पात्र ठरतील, असे पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-1 अमोल तांबे यांनी कळविले आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.